भारतीय पत्रकार संघाच्या धाराशिव जिल्हा संघटकपदी शटप्पा धुतर्गी यांची निवड; आलूर येथे गुरुपौर्णिमेनिमित्त सत्कार
आलूर (ता. उमरगा) :
गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून उमरगा तालुक्यातील आलूर येथील दत्त मंदिरात एका विशेष सत्कार व नियुक्ती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात ‘भारतीय पत्रकार संघ, धाराशिव’ च्या जिल्हा संघटकपदी शटप्पा धुतर्गी यांची अधिकृत निवड करण्यात आली आहे.
*भारतीय पत्रकार संघाचे धाराशिव जिल्हाध्यक्ष उमेश काळे* यांच्या हस्ते ही निवड करण्यात आली असून, यावेळी धुतर्गी यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. या निवडीमुळे धाराशिव उमरगा तालुक्यातील पत्रकारांचे संघटन अधिक मजबूत होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
याप्रसंगी ‘महाराष्ट्र पोलीस टाईम्स’ व ‘भगवा प्रांत’ न्यूज पेपरचे पत्रकार धनाजी पाटील, नेताजी रूपणर, राहुल गुंड, रवी चव्हाण यांच्यासह आलूर गावातील समस्त ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या महत्त्वपूर्ण निवडीबद्दल पंचायत समिती सदस्य माने साहेब यांनी शटप्पा धुतर्गी यांचे विशेष अभिनंदन केले असून, त्यांच्या पुढील सामाजिक व पत्रकारितेतील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत. धुतर्गी यांच्या निवडीमुळे स्थानिक पत्रकारांमध्ये आणि आलूर ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण असून, त्यांच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.







