Best News Portal Development Company In India

अणदूर येथे भीषण अपघात तीन महिला जागीच ठार तर 12 जण गंभीर जखमी.

आणदूर येथे भीषण अपघात तीन महिला जागीच ठार तर बारा जखमी

—————————————————–
नळदुर्ग ( एस.के. गायकवाड ):
पुणे येथून क्रुझर जीप मधून देवदर्शनासाठी निघालेली भाविक भक्ताची जिप तुळजापूर तालुक्यातील अणदूर येते आली असता जिप चे पुढचे टायर फुटून भीषण अपघात झाला त्यात तीन महिल जागेवर ठार झाल्या तर बारा जण जखमी झाले असून जखमींना उपचारासाठी सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.
या बाबत मिळालेली प्राथमिक माहिती अशी की पुणे येथून तुळजापूर कडे देव दर्शनासाठी क्रुजर जिप कमांक एम. एच. २४ व्ही. ४९४८ ही
भरदाव वेगाने अणदूर नजीक राष्ट्रीय महामार्गावर चिवरीपाटी येथे आली असता अचानकपणे या जीपचे पुढचे टायर फुटून भिषण अपघात झाला.या अपघातात तिन महिलांचा जागेवरच मृतू झाला तर १२ जन जखमी झाले असून सर्व जखमीना नळदुर्ग येथिल उपजिल्हा रुग्नालयात प्रथोमपचार करून सोलापूर येथे शासकीय रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले.पुढील तपास नळदुर्ग पोलीस करित आहेत.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india