उपमुख्याध्यापक राधाकृष्ण कोंढारे यांचा सेवापूर्ती सोहळा…
उमरगा/लोहारा प्रतिनिधी आदिनाथ भालेराव.
उमरगा तालुक्यातील मुरूम येथील प्रतिभा निकेतन माध्यमिक विद्यालय मुरूम येथील उपमुख्याध्यापक राधाकृष्ण कोंढारे यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा संपन्न झाला.शैक्षणिक क्षेत्रात 34 वर्षे उल्लेखनीय कार्य केल्यानंतर
1992 मध्ये शिक्षक म्हणून रूजू झालेल्या कोंढारे सर यांना 2025 उपमुख्याध्यापक पदी पदोन्नती मिळाली. आज ते 31 जुलै 2026 रोजी सेवानिवृत्त झाले त्यांनी अनेक विद्यार्थी घडविले आहेत. प्रत्येक व्यक्तीने आपल्या जीवनामध्ये प्रामाणिकपणे कार्य केल्यास त्याला त्याचे फलित ही योग्य मिळते. त्याचप्रमाणे उपमुख्याध्यापक राधाकृष्ण कोंढारे यांनी ही या संस्थेमध्ये प्रामाणिकपणे कार्य केले. तेव्हा इतरांनी ही त्यांचा आदर्श घेतला पाहिजे असे प्रतिपादन प्राचार्य उल्हास घुरघुरे यांनी केले.सेवाकाळातील जुन्या आठवणींना उजाळा दिली. कोंढारे सर यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्राचार्य उल्हास घुरघुरे प्रमुख पाहुणे म्हणून उपप्राचार्य उमाकांत महामुनी पर्यवेक्षक विवेकानंद पळसाळगे,नूतन विद्यालयाचे मुख्याध्यापक राजशेखर कोरे सर,प्रल्हाद काळे सर,हे उपस्थित होते.
प्रा.अण्णाराव कांबळे,प्रा.सुधीर नाकाडे, प्रा.नारायण सोलंनकर, प्रा.विश्वजीत अंबर, प्रा.राघवेंद्र धर्माधिकारी, प्रा.बिभीषण बंडगर, प्रा.दयानंद राठोड,प्रा.अमोल गायकवाड, प्रा.रत्नदीप वाकडे, प्रा.सलीम जमादार,प्रा.अजित राठोड,प्रा.दीपक सांगळे,प्रा.सरस्वती तपसाळे,प्रा.माधुरी नरगिडे, बालाजी बिंदे,शिवशरण तांबडे, संतोषकुमार सूर्यवंशी, महावीर भोजने, मल्लिनाथ चव्हाण, हेमंत आकुसकर, शिवानंद जेऊरे महावीर हुग्गे,महावीर भोजने आदीसह शिक्षक शिक्षिका उपस्थित होते.
सूत्रसंचालन शाहीन तांबोळी, प्रास्ताविक रविकांत स्वामी तर आभार पवन पाटील यांनी मानले.







