लातूर येथील श्री रामलिंगेश्वर संस्थांच्या आयोजित अखंड हरिनाम सप्ताहास विधानपरिषदेचे आमदार बसवराज पाटिल यांची उपस्थिती.
उमरगा लोहारा प्रतिनिधी आदिनाथ भालेराव.
श्री. रामलिंगेश्वर संस्थान, लातूर यांच्या वतीने आयोजित अखंड हरीनाम सप्ताह व आषाढी यात्रा महोत्सवास विधानपरिषदेचे आमदार बसवराज पाटील उपस्थित राहुन घेतले दर्शन.
यावेळी श्री. रामलिंगेश्वरांच्या चरणी नतमस्तक होत सर्वांच्या सुख, समृद्धी आणि निरोगी आयुष्यासाठी प्रार्थना केली. तसेच प्रसिद्ध कथावाचक भागवताचार्य ह.भ.प. प्रकाशजी महाराज साठे (धारूरकर) यांच्या अमृतमय वाणीतून श्रीमद्भागवत कथा श्रवण करण्याचे भाग्य लाभले. याचप्रमाणे ह.भ.प. श्री. सद्गुरू गहिनीनाथजी महाराज औसेकर यांनी केलेल्या आशिर्वावचनाचे श्रवण केले.
यावेळी संस्थानचे सचिव तथा लातूर महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते देविदास काळे, विक्रमजी चव्हाण, शिरीषप्पा उटगे, संगमेश्वर ठेसे, बसवराज धाराशिवे, गजानन मल्लाडे, विठ्ठलल साई सहकारी साखर कारखाना संचालक दिलीप भालेराव, मधुसूदन पारीख, विजयजी काळे, संजयजी काथवटे, महेश धायगुडे, संतोष तिवारी, संजयजी सांडूर, नेताजी गडदे, व्यंकटराव सरवदे, जगन्नाथ खेतरे तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते.








