रुपामाता परिवार धाराशिव कडून आमदार बसवराज पाटील यांचा भव्य सत्कार संपन्न
————————————————
नळदुर्ग (एस.के.गायकवाड):
धाराशिव-लातूर-बीड स्थानिक प्राधिकरण विधान परिषद निवडणुकीतील ऐतिहासिक विषयाबद्दल आमदार बसवराज पाटील यांचा रूपामाता परिवार धाराशिवच्या वतीने अँड.व्यंकट गुंड पाटील यांच्या पुढाकारातून जागतिक मैत्री दिनाचे औचित्य साधून भव्य सत्कार करण्यात आला.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून खासदार ओमराजे निबांळकर, माजी आमदार सुरजितसिंग ठाकूर, जेष्ठ कार्यकर्ते कोंडाप्पा काळे,उपस्थित होते. प्रारंभी महाराष्ट्राचे आराध्य दैवत कुलस्वामिनी आई तुळजाभवानी व अँड.व्यंकट गुंड पाटील यांचे माता-पिता यांच्या प्रतिमांचे पूजन करून अभिवादन करण्यात आले
याप्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते रूपा मता परिवाराकडून आमदार बसवराज पाटील यांचा फेटा पुष्पहार देऊन भव्य नागरी सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अँड.व्यंकट गुंडपाटील यानी केले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून बोलताना खासदार ओम राजे निंबाळकर म्हणाले की सामान्य माणूस केंद्रस्थानी ठेवून आपण काम करत असून ज्या दिवशी निवडणुकीचा निकाल लागला त्या दिवसापासून मी लोकसभा मतदार संघातील सर्व जनतेचा प्रतिनिधी म्हणून काम करतो.माझ्या कडे येणाऱ्या माणसाला मी कोणत्या पक्षाचे असे मी कधिच विचारत नाही. मी माझ्या परीने लोकसभा मतदारसंघाचा विकास करण्याचा प्रयत्न करतो श्रेय वादासाठी कधीही पुढे येत नाही. मी आता महायुतीत आलो आहे त्यामुळे सर्वांनी एकमेकांना मान सन्मान देत लोकसभा मतदारसंघाचा विकास करण्याचा प्रयत्न करू तर माजी आमदार सुरजितसिंग ठाकूर म्हणाले की भाजपा, कोणाच्या मालकीचा पक्ष नसून तो जनतेचा पक्ष आहे तेंव्हा आमच्या गावाकडे निश्चित रहावे व्यक्ती निष्ठेपेक्षा पक्षनिष्ठेला महत्त्व द्यावे,
तर सत्काराला उत्तर देताना देताना आमदार बसवराज पाटील म्हणाले की जागतिक मैत्री दिनी माझा सत्कार होतोय हे मी माझेभाग्य समजतो आपण सर्वजण भाजपा व मित्र पक्षाच्या महायुती तून काम करत आहोत तेंव्हा भविष्यामध्ये आपण सर्वांनी एकत्रपणे एकमेकांच्या हातात हात घालून आपल्या जिल्ह्याचे मागासलेपणाचे नाव पुसून काढण्याचा प्रयत्न करूया.
यावेळी जेष्ठ कार्यकर्ते कोंडाप्पा कोरे, रामदास कोळगे, खंडेराव चौरे,सुधाकर गुंड, भीमाशंकर असुरे ह.भ.प. वसंतराव नागदे सुधीर पाटील अजित गुंड पाटील,मधुकर तावडे अँड.अनिल काळे,सुरज साळुंखे,प्रकाश आष्ठे, दत्ता राजमाने,रुपामाता परिवारातील सर्व पदाधिकारी सह जिल्ह्यातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.







