Best News Portal Development Company In India

वाशी पोलिसांची मोठी कारवाई: दरोड्याच्या तयारीत असलेली टोळी गजाआड, पोलिसांवर दगडफेक करून पळण्याचा प्रयत्न निष्फळ!

वाशी पोलिसांची मोठी कारवाई: दरोड्याच्या तयारीत असलेली टोळी गजाआड, पोलिसांवर दगडफेक करून पळण्याचा प्रयत्न निष्फळ!
​तुळजापूर प्रतिनिधी:- दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या एका सराईत टोळीचा वाशी पोलिसांनी रविवारी रात्री पर्दाफाश केला आहे. या कारवाईदरम्यान आरोपींनी पोलिसांवर दगडफेक करून त्यांना जखमी करण्याचा आणि वाहनाचे नुकसान करण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी सतर्कता दाखवत आरोपींचे मनसुबे उधळून लावले.
​दिनांक १ ऑगस्ट २०२६ च्या मध्यरात्री ११:०० ते २ ऑगस्टच्या पहाटे १:३० वाजेच्या सुमारास वाशी पोलीस ठाण्याचे पथक बोरी पाटी ते कन्हेरवाडी रस्त्यावर ए. डी. एम. पेट्रोलिंग (गस्त) करत होते. या दरम्यान रस्त्याच्या कडेला पांढऱ्या रंगाची टाटा सुमो (क्रमांक: MH 25 T 0656) संशयास्पदरित्या उभी असलेली दिसून आली.
​पोलीस पथकाने संशय आल्याने वाहनाजवळ जाऊन पाहणी केली असता, त्यात ८ अनोळखी इसम दरोडा टाकण्याच्या पूर्वतयारीसह बसलेले आढळले. त्यांच्याकडून दरोड्यासाठी लागणारे घातक साहित्य— दोन कटर, कत्ती, कोयते आणि लाल तिखट/चटणी पावडर असा एकूण ₹ ५,००,०००/- (पाच लाख रुपये) किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
​पोलीस पथकाने आरोपींना गाडी थांबवून शरण येण्यास सांगितले असता, पकडले जाण्याच्या भीतीने आरोपींनी पोलीस वाहनावर (क्र. MH 25 BF 6136) जोरदार दगडफेक केली. या हल्ल्यात पोलीस वाहनाचे मोठे नुकसान झाले असून, फिर्यादी पोलीस कर्मचारी प्रविण बबन साठे आणि त्यांचा स्टाफ जखमी झाला आहे.
​याप्रकरणी फिर्यादी प्रविण साठे यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरून वाशी पोलीस ठाण्यात ८ आरोपींविरोधात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम:​३१०(४) व ३१०(५) (दरोड्याची पूर्वतयारी करणे)​१२१(१) (सरकारी कर्मचाऱ्याला कर्तव्यापासून रोखण्यासाठी दुखापत करणे)
​३२४ (घातक शस्त्रांनी दुखापत पोहोचवणे व सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे)
​अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाशी पोलीस या प्रकरणाचा पुढील सखोल तपास करत आहेत. सदरील सिने- स्टाईल कारवाई मुळे वाशी पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india