*श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयात ८ ऑगस्ट रोजी दीक्षांत सोहळ्याचे आयोजन*
[ पदवीधर विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक यशाचा गौरव मान्यवरांच्या उपस्थितीत होणार]
उमरगा /लोहारा प्रतिनिधी आदिनाथ भालेराव.
येथील श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयात शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये पदवी प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांसाठी दीक्षांत सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा सोहळा शनिवार, दि. ८ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ११.३० वाजता महाविद्यालयात आयोजित करण्यात आला आहे.
या दीक्षांत सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी भारत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. अमोल शिवाजीराव मोरे राहणार असून, मुंबई मराठी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष मा. राजेंद्र हुंजे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात येणार आहे.
या दीक्षांत सोहळ्यास भारत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष मा. अश्लेष भैया मोरे, सचिव मा. जनार्दन साठे, सचिव मा. पद्माकरराव हराळकर तसेच सहसचिव मा. डॉ. सुभाष वाघमोडे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. संस्थेचे संचालक डॉ. विजय पाटील हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.
या दीक्षांत सोहळ्यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक यशाचा गौरव होणार असून, त्यांच्या पुढील वाटचालीसाठी हा सोहळा प्रेरणादायी ठरणार आहे. सोहळ्यास पदवीधर विद्यार्थी, पालक, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय अस्वले यांनी केले आहे.






