Best News Portal Development Company In India

धाराशिवमध्ये शेतात ‘त्या’ एकाच झाडाने उडवली खळबळ! आठ किलोचा गांजा जप्त, पोलिसांत गुन्हा दाखल.

धाराशिवमध्ये शेतात ‘त्या’ एकाच झाडाने उडवली खळबळ! आठ किलोचा गांजा जप्त, पोलिसांत गुन्हा दाखल.
​तुळजापूर प्रतिनिधी;-
शेतात इतर पिकांच्या आडोशाला बेकायदेशीर गांजाची लागवड करणाऱ्या एका अज्ञात व्यक्तीविरोधात धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस कारवाईत सुमारे १ लाख ६६ हजार ५०० रुपये किमतीची ८ किलो ३२५ ग्रॅम वजनाची गांजाची वनस्पती (कॅनाबिस) जप्त करण्यात आली आहे.
​नेमकी घटना काय?
​मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवार, ४ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ७:३० वाजताच्या सुमारास धाराशिव ग्रामीण पोलिसांना जहागिरदारवाडी शिवारात अवैध गांजाची लागवड झाल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी जहागिरदारवाडी येथील शेत गट क्र. ७५ मध्ये छापा टाकला असता, तेथे एका अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणासाठी कॅनाबिस (गांजा) या अंमली वनस्पतीचे एक मोठे रोप लावल्याचे आढळून आले.
​लाखांचा मुद्देमाल जप्त-
​पोलीस पथकाने तत्परता दाखवत सदर ठिकाणी छापा मारून १,६६,५०० रुपये किमतीचे तब्बल ८.३२५ किलो ग्रॅम वजनाचे गांजाचे रोप आणि इतर संबंधित साहित्य जप्त केले.
या प्रकरणी अंमली पदार्थ विरोधी कायद्यान्वये (गुंगीकारक औषधीद्रव्य व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम – NDPS Act) कलम ८(ब) आणि २०(अ) अंतर्गत धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून, पोलीस या अज्ञात आरोपीचा शोध घेत आहेत.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india