तुळजापूर शहरात चोरट्यांचा धुमाकूळ: शाळेजवळून ६६ हजारांचे ऑटो लेव्हल मशीन, डिझेल अन् बॅटऱ्या लंपास!
तुळजापूर प्रतिनिधी :-तुळजापूर शहरात चोरट्यांचा धुमाकूळ सुरूच तुळजापूर खुर्द येथील नगर परिषद शाळेच्या परिसरातून अज्ञातांनी बांधकाम आणि सर्व्हेसाठी वापरल्या जाणाऱ्या विविध साहित्यासह डिझेल आणि बॅटऱ्यांची चोरी केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दयानंदनगर (नळदुर्ग रोड, तुळजापूर) येथील रहिवासी स्वप्निल सुभाष चव्हाण (वय ३४) यांनी या संदर्भात फिर्याद दिली आहे. तुळजापूर खुर्द न. प. शाळेजवळ ठेवलेले त्यांचे ऑटो लेव्हल मशिन (केशरी व पांढरा पट्टा असलेले), एल अँड टी डबल ड्रम रोलर मशीनमधील ७० लिटर डिझेल, केस रोलर मधील हायड्रोलिक ऑइल, सोनिक कंपनीची १०० A बॅटरी आणि एक्साईड कंपनीची १०० A बॅटरी असा एकूण ६६,००० रुपये किमतीचा मुद्देमाल अज्ञातांनी चोरून नेला.
ही चोरीची घटना उघडकीस आल्यानंतर स्वप्निल चव्हाण यांनी दि. ०७ ऑगस्ट २०२६ रोजी तुळजापूर पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार दाखल केली. प्राप्त खबरेवरून तुळजापूर पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०३(२) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलीस सध्या आरोपींचा कसून शोध घेत आहेत. पुढील तपास तुळजापूर पोलीस करत आहेत. तरी संशयास्पद काही आढळल्यास त्वरित तुळजापूर पोलिसांची संपर्क साधावा असे आवाहन करण्यात येत आहे.






