Best News Portal Development Company In India

धाराशिवमध्ये २० ऑगस्टला ‘अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण समर्थनार्थ’ धडकणार भव्य ‘महामोर्चा’!

धाराशिवमध्ये २० ऑगस्टला ‘अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण समर्थनार्थ’ धडकणार भव्य ‘महामोर्चा’!
​तुळजापूर प्रतिनिधी :- अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरणाच्या (Categorization/Sub-classification) समर्थनार्थ येत्या गुरुवार, दि. २० ऑगस्ट २०२६ रोजी धाराशिव शहरात ‘अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण कृती समिती, धाराशिव’ यांच्या वतीने एका भव्य ‘महामोर्चा’ चे आयोजन करण्यात आले आहे.
​आरक्षणाच्या हक्कासाठी आणि भावी पिढीच्या उज्ज्वल भविष्यासाठी आयोजित करण्यात आलेला हा मोर्चा धाराशिव जिल्ह्यातील सामाजिक आणि राजकीय वर्तुळात मोठ्या चर्चेचा विषय ठरत आहे.
​मोर्चाचे वेळापत्रक आणि मार्ग-
​दिनांक: गुरुवार, २० ऑगस्ट २०२६
​वेळ: सकाळी ११:३० वाजता
​प्रारंभ ठिकाण: साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे चौक, धाराशिव
​समापन ठिकाण: जिल्हाधिकारी कार्यालय, धाराशिव.
​हा महामोर्चा साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे चौकापासून निघून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकेल. तेथे या मोर्चाचे रूपांतर एका ‘विराट महासभेत’ होणार असून, त्यानंतर प्रशासनाला विविध मागण्यांचे निवेदन सादर केले जाईल.
​”एक दिवस जातीसाठी… भावी पिढीच्या भविष्यासाठी!”
​आयोजकांनी “आरक्षण आमच्या हक्काचं, आहे आमच्याच बापाचं…” आणि “एक दिवस जातीसाठी, भावी पिढीच्या भविष्यासाठी” असे ठाम आवाहन करत सर्व समाजबांधवांना, तरुणांना आणि नागरिकांना या महामोर्च्यात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
​या ऐतिहासिक महामोर्चाच्या माध्यमातून अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरणाची मागणी अधिक तीव्र केली जाणार आहे.
​आयोजक- अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण कृती समिती, धाराशिव.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india