Best News Portal Development Company In India

*८४ हजार बौद्ध स्तूप शिलालेख व स्तंभ लेखाच्या माध्यमातून बौद्ध धम्माचा प्रचार प्रसार राजे सम्राट अशोकाने केला-प्रा.सुधीर कांबळे*

*८४ हजार बौद्ध स्तूप शिलालेख व स्तंभ लेखाच्या माध्यमातून बौद्ध धम्माचा प्रचार प्रसार राजे सम्राट अशोकाने केला-प्रा.सुधीर कांबळे*
उमरगा /लोहारा आदिनाथ भालेराव.
दि.१४ जगातील ८४ हजार बौद्ध स्तूप व त्या स्तूपाची संपूर्ण माहिती स्तंभलेख व शिलालेखाच्या माध्यमातून बौद्ध धम्माचा प्रचार व प्रसार करणारे जगातील सर्वोत्तम राजे सम्राट अशोकांनी केलेला आहे असे मत भारतीय बौद्ध महासभा ग्राम शाखा कवठा येथील वर्षावास कार्यक्रम आयोजित संस्थेच्या ३२ विषयातील पाचवा विषय बौद्ध लेण्या व स्तंभलेख व शिलालेख या विषयावरती बोलत असताना प्रा.सुधीर कांबळे यांनी आपले मत व्यक्त केले.

दिनांक ९ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री आठ वाजता भारतीय बौद्ध महासभा ग्राम शाखा कवठा आयोजित वर्षावास येथे विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या रूपाचे पूजन भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा संघटक सुधीर कांबळे तसेच तालुकाध्यक्ष बौद्धाचार्य उमेश सुरवसे भारतीय बौद्ध महासभा यांच्या हस्ते दीप धूप व पुष्पहार अर्पण करून करण्यात आले.

प्रथम भगवान बुद्ध व बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचेपुजन उपासिका शोभा सुरवसे व उपासक दिलीप सुरवसे यांच्या हस्ते दीप धूप व पुष्पाणी करण्यात आले यावेळी भगवान बुद्धाने त्यांचा धम्म या ग्रंथाचे वाचन दिलीप सुरवसे यांनी केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष बौद्धाचार्य उमेश सुरवसे हे होते तर बौद्ध देण्या व स्तंभलेख शिलालेख या विषयाचे प्रवचनकार प्राध्यापक सुधीर कांबळे सर, ग्राम शाखा अध्यक्ष गीता कांबळे, बाबासाहेब आंबेडकर मोफत सल्ला केंद्राचे अध्यक्ष दिलीप सुरवसे आदींच्या प्रमुख उपस्थिती सह सर्व बोध उपासक उपासिका यांची उपस्थिती होती.

प्रा.सुधीर कांबळे बोलत असताना पुढे म्हणाले की, भारतामध्ये भगवान बुद्धांच्या नंतर बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी सम्राट अशोकाने संपूर्ण जगामध्ये बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्याचा साठी आपले सर्व राज्यातील धनदौलत या धम्माच्या प्रचारासाठी लावून 84 हजार बौद्ध स्तूप उभं केले लेण्या कोरल्या आणि त्या ठिकाणी स्तंभलेख व शिलालेखाच्या माध्यमातून पालेभाषेमधील बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार केला त्याचे अवशेष आजही या भारत देशासह जगभरामध्ये आढळून येत आहेत.

स्तंभलेख व शिलालेखाच्या माध्यमातून पालेभाषेमध्ये असलेला मजकूर आजही आपल्याला बौद्ध धम्माचा शिकवण देण्यामध्ये यशस्वी ठरत आहे भगवान बुद्धाने प्रचार आणि प्रसार करत असताना कुठेही स्वतःचा नाम उल्लेख केला नाही हे सर्वात मोठं श्रेष्ठत्व सम्राट अशोकाने दाखवलेला आहे आणि एक स्तूप उभारले मात्र कुठेही आपलं नाव त्यांनी दिले नाही ही एक सर्वोत्तम गुण असल्याचे समजते त्याचबरोबर आपल्या स्वतःचे मुलं बौद्ध धम्माच्या प्रचार आणि प्रसारासाठी त्यांनी दान दिले त्यामुळे सम्राट अशोकांचे नाव हे अजरामर आहे असे मत प्राध्यापक सुधीर कांबळे यांनी व्यक्त केले.

कार्यक्रमातील अध्यक्षीय समारोप करत असताना भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष बौद्धाचार्य उमेश सुरवसे म्हणाले की, आपल्यातील अनिष्ट प्रथा व दुष्ट विचारसरणी तसेच आपल्यामध्ये असलेल्या वाईट प्रवृत्तींना बाहेर काढणे म्हणजेच बौद्ध धम्माचा स्वीकार करणे असे होईल.
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या भारतीय बौद्ध महासभा या संस्थेअंतर्गत समता सैनिक दलाला शंभर वर्षे पूर्ण होत असल्यामुळे समता सैनिक दलाचे सैनिक प्रत्येक तालुक्यामध्ये १००० सैनिकांची बटालियन निर्माण करण्याचे आदेश संस्थेने दिलेले आहेत त्याप्रमाणे आपल्याला उमरगा तालुक्यामध्ये १००० सैनिक येणाऱ्या वर्षावास कार्यक्रमाच्या माध्यमातून उभा करायचे आहेत व त्यांची यादी त्यांची ड्रिल सर्वकाही माहीती भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष तथा समता सैनिकाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.भीमराव यशवंतराव आंबेडकर साहेब तसेच स्टाफ ऑफिसर राष्ट्रीय उपाध्यक्ष ऍडव्होकेट डॉ. एस के भंडारे साहेब महाराष्ट्राचे अध्यक्ष युजी बोराडे साहेब यांच्याकडे सुपूर्द करायचे आहे त्यासाठी आपणाला सैनिक होणे सुद्धा तितकच महत्त्वाचे असल्याचे मत व्यक्त करत येणाऱ्या दहा दिवसांमध्ये समता सैनिक दलाच्या शिबिरामध्ये सहभागी होण्याचे आव्हान तालुकाध्यक्ष बौद्धाचार्य उमेश सुरवसे यांनी उपस्थिताना केले.

यावेळी पौर्णिमा कांबळे मालनबाई कांबळे कुसुम कांबळे प्रभावती कांबळे कावेरी ताई सुरवसे मुद्रिका सुरवसे गीता कांबळे जयश्री कांबळे सीमा कांबळे कांबळे ठकुबाई कांबळे पूजा सोनकांबळे शिक्षा कांबळे निर्मला कांबळे कोमल कांबळे गेंदाबाई कांबळे शोभा सुरवसे अनिता कांबळे कांता कांबळे ुकुमार सुरवसे रुक्‍मीनबाई कांबळे कलाबाई कांबळे योजना कांबळे श्रीदेवी सुरवसे लता कांबळे अरुणा कांबळे उषा बनसोडे शोभा कांबळे महादेवी कांबळे वैजंता कांबळे शालू कांबळे पंचशीला कांबळे शिवकन्या कांबळे सुशीला कांबळे शारदा सुरवसे विठाबाई कांबळे जिजाबाई सुरवसे विजाबाई सुरवसे रुक्मिणी कांबळे शांताबाई कांबळे नागुबाई कांबळे मनीषा कांबळे सोनाली कांबळे प्रतिमा कांबळे रंजना कांबळे वनिता कांबळे रुक्मिणी कांबळे बळीराम कांबळे पंडित कांबळे दिलीप सुरवसे कालींदा कांबळे छायाबाई कांबळे बाळासाहेब कांबळे आदी संपूर्ण भीम नगर येथील सर्व बौध्द उपासक उपासिका सर्व तरुण मित्र मंडळ यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व ग्रंथ वाचन दिलीप सुरवसे यांनी केली तर कार्यक्रमाचा समारोप अध्यक्ष वाचनाने करण्यात आला.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india