15 ऑगस्ट निमित्त विविध कला, गुणदर्शन कार्यक्रम प्रतिभा निकेतन उच्च माध्यमिक विद्यालय मुरूम येथे घेण्यात आले…
उमरगा /लोहारा प्रतिनिधी आदिनाथ भालेराव.
उमरगा तालुक्यातील मुरूम येथील प्रतिभा निकेतन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात वक्तृत्व स्पर्धा व देशभक्तीपर गीत गायन स्पर्धाघेण्यात आले. यावेळी चैतन्य मूर्ती माधवराव पाटील काका यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा.आण्णाराव कांबळे, प्रमुख पाहुणे अंबर व्ही.सी,रामपुरे एस. एन,सोलंकर एन.टी,तर यांची प्रमुख उपस्थिती प्रा.माधुरी नरगिडे,हे होते.
या वेळी स्वागत गीत पूनम राठोड, देशभक्तीपर गीत, सरोजा गाडेकर, लक्ष्मी गाडेकर,शिवकन्या भालकाटे, सुप्रिया जाधव प्रीती बेळे, नम्रता वाकळे, सोनाली धुमा, मनीषा कांबळे श्रद्धा माळशेट्टी,प्रगती स्वामी,आदी विद्यार्थिनी स्पर्धेत भाग घेतले.
या मुलांना मार्गदर्शक म्हणून प्रा.अजित सूर्यवंशी यांनी केले.
तर प्रा.बिभीषण बंडगर व प्रा. जमादार सलीम यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.
या वेळी अध्यक्षीय समारोपात प्रा.आण्णाराव कांबळे यांनी आपले मनोगत मांडत असताना आपण सर्व विद्यार्थ्यांनी आपापल्या परीने देशासाठी काहीतरी योगदान दिले पाहिजे म्हणजे स्वच्छता ठेवणे शिक्षण घेणे इतरांना मदत करणे व पर्यावरणाचे संरक्षण करणे आणि प्रामाणिकपणे काम करत राहणे हे देखील एक प्रकारचे देशी सेवाच आहे आपण सर्वजण एकजुटीने राहून आपल्या देशाला अधिक प्रगतीपथावर घेऊन जाऊया अशी याप्रसंगी आपण सर्वजण प्रतिज्ञा करून असे आव्हान करून यात सभाधीटपणा रुजावा, नवे कलावंत घडावेत यासाठी हा उपक्रम राबविला जातो. असे आपले मत प्राध्यापक आण्णाराव कांबळे यांनी मांडले.
यावेळी प्रा.रत्नदीप वाकडे, प्रा.महेश संगशेट्टी,प्रा.सरस्वती तपसाळे,साक्षी महामुनी हे होते यांच्यासह विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सतीश रामपुरे यांनी तर सूत्रसंचालन प्रा.अजित सूर्यवंशी आभार प्रा.बिभीषण बंडगर यांनी मानले.






