Best News Portal Development Company In India

भूम व वाशी पोलिसांची संयुक्त धडक कारवाई; ₹१६.५८ लाखांच्या मुद्देमालासह प्रतिबंधित गुटखा जप्त!

भूम व वाशी पोलिसांची संयुक्त धडक कारवाई; ₹१६.५८ लाखांच्या मुद्देमालासह प्रतिबंधित गुटखा जप्त!
​दोन पिकअप वाहनांसह गुटखा जप्त; वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
​तुळजापूर प्रतिनिधी;-
धाराशिव-बीड राष्ट्रीय महामार्गावर भूम आणि वाशी पोलिसांनी संयुक्तपणे धाडसी कारवाई करत मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांची वाहतूक उघडकीस आणली आहे. या कारवाईत पोलिसांनी दोन पिकअप वाहनांसह तब्बल ₹१६,५८,५२२/- किमतीचा ऐवज जप्त केला आहे.
​गुप्त माहितीच्या आधारे टाकली धाड
​पोलीस अधीक्षक श्रीमती रितु खोखर, अपर पोलीस अधीक्षक श्री. सचिन पांडकर व उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. अनिल चोरमले यांच्या मार्गदर्शनाखाली परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक श्री. अमोल मोहिते यांना अवैध गुटखा वाहतुकीबाबत गोपनीय माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे दि. ११ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री सुमारे १० वाजता दहिफळ शिवारातील विश्वजित ढाब्याच्या पाठीमागे सापळा रचून ही कारवाई करण्यात आली.
​तपासणीदरम्यान संशयित महिंद्रा बोलेरो पिकअप (क्र. MH-23-AU-5810) आणि अशोक लेलँड पिकअप (क्र. MH-14-EM-5173) या वाहनांमधून खालील प्रतिबंधित माल जप्त करण्यात आला:
​प्रतिबंधित गुटखा व तंबाखू: ‘गोवा १०००’, ‘केसरीयुक्त विमल पान मसाला’, ‘व्ही-१ सुगंधित तंबाखू’, ‘शॉट ९९९ सुगंधित तंबाखू’ व ‘डायरेक्टर स्पेशल पान मसाला’ (किंमत ₹६,५८,५२३/-)
​वाहने: दोन पिकअप वाहने (अंदाजे किंमत ₹१०,००,०००/-)
​एकूण जप्त मुद्देमाल: ₹१६,५८,५२२/-
​वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
​या प्रकरणी अन्न सुरक्षा अधिकारी श्री. रोहित दिनेश फंदी (वय २५) यांच्या फिर्यादीवरून वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा क्र. २६९/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १२३, २२३, २७४, २७५ आणि अन्न सुरक्षा व मानके अधिनियम, २००६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विक्रीच्या उद्देशाने ही वाहतूक केली जात असल्याचे समोर आले असून, वाहनांचे फरार चालक व या रॅकेटमागील मुख्य सूत्रधारांचा शोध पोलीस घेत आहेत.
​सदर धडक कारवाई परिविक्षाधीन पो.उ.अ. श्री. अमोल मोहिते, पोलीस निरीक्षक श्री. शिंदे, श्री. कानगुडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. खांडे, श्री. सावंत, पोलीस उपनिरीक्षक श्री. बर्डे, श्री. झराड तसेच भूम व वाशी पोलीस ठाण्याच्या पथकाने संयुक्तपणे पार पाडली.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india