Best News Portal Development Company In India

वागदरी येथे विविध ठिकाणी स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.

वागदरी येथे विविध ठिकाणी स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.
————————————————-
नळदुर्ग (एस. के.गायकवाड):
तुळजापूर तालुक्यातील मौजे वागदरी येथे विविध ठिकाणी दि.15 ऑगस्ट 2026 रोजी देशाचा 80 व्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने विविध ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यातआले होते.
येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने शाळेचे मुख्याध्यापक बी.बी.सदर यांच्या हस्ते राष्ट्रीय तिरंगा ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. या प्रसंगी सरपंच सौ.तेजाबाई शिवाजी मिटकर, ग्रा.प.सदस्य ज्ञानेश्वर पाटील, अमोल पवार,गुणाबाई बनसोडे,मुक्ताबाई बिराजदार,मीनाक्षीताई बिराजदार, सुरेखाताई यादव,शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष महादेव वाघमारे,उपाध्य कोमल झेडारे,सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र पाटील, माजी सरपंच राजकुमार पवार,पोलीस पाटील बाबुराव बिराजदार, दत्तात्रय सुरवसे सहशिक्षक काळे अनपट सहशिक्षिका मासे सह शालेय विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी शिष्यवृत्ती धारक गुणवंत विद्यार्थी….उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शाल पुष्पहार, सन्मान चिन्ह देवून सत्कार करुन गावातून शालेय विद्यार्थ्यांची प्रभात फेरी काढण्यात आली.
तसेच येथील ग्रामपंचायत कार्यालयाच्या प्रागनात स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यातआले होते.
प्रारंभी सरपंच सौ.तेजाबाई शिवाजी विटकर व सर्व ग्रामपंचायत सदस्य यांच्या हस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमाचे पूजन करून सरपंच सौ.तेजाबाई मिटकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.याप्रसंगीजेष्ठ कार्यकर्ते शिवाजी मिटकरी गुरुजी ,किशोर सुरवसे,रिपाइ आठवले चे जिल्हा सचिव एस. के. गायकवाड,नागनाथ सुरवसे सह ग्रामस्थ महिला युवा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी ग्रामपंचायतीच्या वतीने ही गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला .
तर येथील भीम नगर येथे पंचशील बुद्ध विहार समाज मंदिराच्या प्रांगणात स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने डॉक्टर बाबासाहेब आबेडकर जयंती उत्सव कमिटी वागदरी च्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.प्रारंभी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक बी.बी. सगर,ग्रामपंचायत सदस्य गुनाबाई बनसोडे,मुक्ताबाई बिराजदार, मीनाक्षीताई बिराजदार,डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव कमिटीचे अध्यक्ष महादेव वाघमारे,सचिव चंद्रकांत वाघमारे, उपाध्यक्ष दीपक वाघमारे अगणवाडी ताई पद्ममीनी पवार यांच्या हस्ते तथागत भगवान गौतम बुद्ध व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव कमिटीच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले.या प्रसंगी सेवा निवृत्त पोलीस हवालदार संदिपान वाघमारे,अनिल वाघमारे, सूर्यकांत वाघमारे गीताबाई झेडारे,मुक्ताबाई वाघमारे,सुरज गायकवाड सचिन सुरवसे,सहादेव वाघमारे, कलाप्पा वाघमारे बाळु काबले, हनुमंत वाघमारे वाघमारे,रमेश वाघमारे सह विद्यार्थी ग्रामस्थ महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india