Best News Portal Development Company In India

निलंबनाची तात्काळ कारवाई:२०० रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या तामलवाडीतील अंमलदारावर गंडांतर!

निलंबनाची तात्काळ कारवाई : २०० रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या तामलवाडीतील पोलीस अंमलदारावर गंडांतर!

तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी

जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीमती रितु खोखर यांनी कर्तव्यातील बेपर्वाई आणि गैरवर्तणुकीबाबत शून्य सहनशीलतेची भूमिका घेत तामलवाडी पोलीस ठाण्यातील पोलीस अंमलदार (बकल नं. 1413) अलताफ मकबुल गोलंदाज यांना तात्काळ निलंबित केले आहे.

दि. 19 नोव्हेंबर 2025 रोजी कर्तव्यावर असताना नागरिकाकडून 200 रुपयांची नोट स्वीकारतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. संबंधित प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलिस अधीक्षकांनी आज दिनांक 26 नोव्हेंबर 2025 रोजी निलंबनाचे आदेश जारी केले.

पोलीस विभागात शिस्त, पारदर्शकता आणि जबाबदारीला सर्वोच्च प्राधान्य देण्यात येत असून अशा प्रकारच्या निष्काळजीपणा व लाचखोरीला कोणतीही मुभा दिली जाणार नाही, असेही जिल्हा पोलीस अधीक्षकांनी स्पष्ट केले आहे.

या कारवाईमुळे जिल्ह्यातील पोलीस दलाला स्पष्ट संदेश गेला असून कायदा व सुव्यवस्थेच्या रक्षणकर्त्यांकडून कोणत्याही प्रकारच्या गैरवर्तणुकीला स्थान दिले जाणार नाही, अशी भावना नागरिकांत व्यक्त होत आहे.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india