Best News Portal Development Company In India

भगवंत माध्यमिक विद्यालय मुर्टा येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात संपन्न!

भगवंत माध्यमिक विद्यालय मुर्टा येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात संपन्न!
————————————————
नळदुर्ग (एस. के. गायकवाड):
भगवंत माध्यमिक विद्यालय, मुर्टा ता. तुळजापूर, जि. धाराशिव येथे ८० वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात व देशभक्तीमय वातावरणात संपन्न झाला.

कार्यक्रमाच्या प्रारंभी माजी सैनिक श्री कुमार मोरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध कवायत सादर केली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुर्टा ग्रामपंचायत सरपंच सौ. मिनाताई लोहार होते. प्रमुख पाहुणे म्हणून मा.पोलीस उपनिरीक्षक ज्ञानदेव कदम साहेब मा .मोहन गायकवाड मा. श्रीरंग आण्णा सूरवसे मनोज कदम सर संदिप कदम यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

यावेळी इयत्ता १० वी व १२ वीच्या विद्यार्थ्यांनी कॉपीमुक्त अभियानाची शपथ घेतली. तसेच सर्व विद्यार्थ्यांनी व्यसनमुक्तीची शपथ घेतली. विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर नृत्य, गायन व वक्तृत्व सादर करून उपस्थितांची मने जिंकली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. कांबळे सचिन सर यांनी केले, तर आभार प्रदर्शन श्री. शिंदे सर यांनी केले.

या कार्यक्रमास विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी तसेच गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रम उत्साहपूर्ण, शिस्तबद्ध व देशभक्तीच्या वातावरणात पार पडला.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india