Best News Portal Development Company In India

*समृद्धी इंग्लिश मीडियम स्कूल चिंचोली भुयार येथे ८०वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा!

*समृद्धी इंग्लिश मीडियम स्कूल चिंचोली भुयार येथे ८०वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा*

उमरगा /लोहारा प्रतिनिधी आदिनाथ भालेराव.
उमरगा तालुक्यातील चिंचोली भुयार येथील समृद्धी इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये देशभक्तीचा उत्साह, विद्यार्थ्यांचा जल्लोष आणि तिरंग्याच्या अभिमानाने ८०वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ८.३० वाजता संस्थेच्या उपाध्यक्षा सत्यभामा गायकवाड, चेअरमन विकास गायकवाड आणि मुख्याध्यापिका प्रियंका गायकवाड (कांबळे) यांच्या हस्ते ध्वजारोहणाने करण्यात आली. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले.
यावेळी उपमुख्याध्यापक रावसाहेब बनसोडे यांनी प्रास्ताविकातून स्वातंत्र्य दिनाचे महत्त्व विशद केले. शाळेतील विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध कवायत सादर करून उपस्थितांची मने जिंकली. तसेच विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर मनोगते व्यक्त केली आणि देशभक्तीपर गीतांवर उत्स्फूर्त नृत्य सादर करत वातावरणात राष्ट्रप्रेमाची भावना निर्माण केली.
कार्यक्रमात राणू जाधव मॅडम, पूजा सुरवसे मॅडम, मुख्याध्यापिका प्रियंका गायकवाड आणि संस्थेचे चेअरमन विकास गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबतच देशप्रेम, शिस्त, एकता आणि सामाजिक बांधिलकी जपण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

या कार्यक्रमास विद्यार्थी, पालक, माता-पालक तसेच चिंचोलीभुयार, काटेवाडी,
नाईकनगर परिसरातील प्रतिष्ठित नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. यावेळी पत्रकार विश्वास सोनकांबळे, पत्रकार राहुल थोरात, तसेच शाळेतील उमेश इगवे, यशोदा लोहार आदि उपस्थितीत होते
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समृद्धी गायकवाड यांनी प्रभावीपणे केले, तर आभार प्रदर्शन उपमुख्याध्यापक रावसाहेब बनसोडे यांनी केले. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे स्वातंत्र्य दिनाचा सोहळा उत्साहपूर्ण आणि संस्मरणीय ठरला.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india