वाशीत ‘पृथ्वीराज लॉज’वर पोलिसांचा मोठा छापा; ८ महिलांची सुटका, ३ चालकांवर गुन्हा दाखल!
तुळजापूर प्रतिनिधी ;-
जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध धंद्यांवर मानवी वाहतूक शाखेने मोठी कारवाई करत वाशी येथील ‘पृथ्वीराज लॉज’वर छापा टाकला. या कारवाईत देह व्यापारासाठी डांबून ठेवलेल्या ८ महिलांची सुटका करण्यात आली असून, लॉजच्या ३ चालकांविरुद्ध वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बनावट गिऱ्हाईक पाठवून टाकली धाड
पोलीस अधीक्षक श्रीमती रितु खोखर आणि अपर पोलीस अधीक्षक श्री. सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली मानवी वाहतूक शाखेचे पथक १४ ऑगस्ट २०२६ रोजी गस्तीवर होते. दरम्यान, वाशी हद्दीतील पृथ्वीराज लॉजमध्ये काही महिलांकडून जबरदस्तीने वेश्या व्यवसाय करून घेतला जात असल्याची गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली. पथकाने तातडीने एका बनावट ग्राहकाला पाठवून माहितीची खात्री केली आणि रात्री २१:५० वाजता लॉजवर धाड टाकली.
८ महिलांची सुटका, ३ आरोपी ताब्यात
छाप्यात आठ महिला मिळून आल्या. महिला पोलिसांमार्फत चौकशी केली असता, आरोपी हे स्वतःच्या उपजीविकेसाठी या महिलांना आश्रय देऊन त्यांच्याकडून अनैतिक देह व्यवसाय करून घेत असल्याचे स्पष्ट झाले.
पोलिसांनी घटनास्थळावरून २५,९५० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे:
रोख रक्कम: ₹ २२,९५०
मोबाईल फोन: १
सीसीटीव्ही DVR: १ (मॉडेल नं. TT 630805 MP)
आरोपींची नावे:
श्रीपती उत्तमराव घुले (वय ६२ वर्षे, रा. पारगाव)
अविनाश तेजाप्पा शेट्टी (वय ३८ वर्षे, रा. मंगळूर, कर्नाटक)
सोहेल लियाकत शेख (रा. कोपरखैरणे, नवी मुंबई)
दिनांक १५ ऑगस्ट २०२६ रोजी वाशी पोलीस ठाण्यात तिन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा रजि. क्र. २९५/२०२६ (बी.एन.एस. कलम १४३, १४४, ३(५) सह मानवी अनैतिक व्यवसाय प्रतिबंधक अधिनियम कलम ३, ४, ५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कारवाई करणारे पथक
सदरची कारवाई परि. पोलीस उपअधीक्षक श्रीमती मारकड, पोलीस निरीक्षक श्री. शिंदे, श्री. शेळके, पोलीस उपनिरीक्षक सोनटक्के, महिला पोलीस अंमलदार गिरी (मपोह/८८९), जाधव (मपोह/१४६३) आणि पोलीस नाईक माने (पोना/११७६) यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.






