Best News Portal Development Company In India

गुणवंत विद्यार्थ्यांचा सभापती ॲड.आकांक्षा चौगुले यांच्या वतीने सत्कार*

*गुणवंत विद्यार्थ्यांचा सभापती ॲड.आकांक्षा चौगुले यांच्या वतीने सत्कार*

*नासा जिल्हास्तरीय परिक्षा व एमपीएससी परिक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा गुणगौरव.*
उमरगा/लोहारा प्रतिनिधी आदिनाथ भालेराव.
नासा जिल्हास्तरीय परिक्षेत अंतिम निवड झालेल्या उमरगा तालुक्यातील ३ व लोहारा तालुक्यातील २ गुणवंत विद्यार्थी व स्पर्धा परिक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा उमरगा पंचायत समितीच्या सभापती तथा ज्ञानज्योती फाऊंडेशनच्या अध्यक्षा ॲड.आकांक्षा चौगुले यांच्या वतीने मंगळवार दि.१८ रोजी शहरातील ज्ञानज्योती अभ्यासिकेत सत्कार केला. या विद्यार्थ्यांना अमेरिकेतील नासा अंतराळ संस्थेस भेट देण्याची संधी मिळणार आहे. ॲड.चौगुले यांनी या विद्यार्थ्यांचे, शिक्षक व पालकांचे कौतुक केले.
उमरगा शहरातील सुष्मिता माळी या युवतीची लोकसेवा आयोगामार्फत सब रजीस्ट्रार ऑफीसर व स्टेट टॅक्स इंस्पेक्टर या पदावर निवड झालेली आहे. त्यांनीही उपस्थित विद्यार्थ्यांना त्यांचा संपुर्ण प्रवास व अभ्यासाचे नियोजन याबाबत मार्गदर्शन केले.
धाराशिव जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभाग अंतर्गत नासा जिल्हा जिल्हास्तरीय परिक्षेत उमरगा तालुक्यातील जि.प.प्रा.शाळा सुपतगाव येथील श्रेयश ज्ञानेश्वर गुरव, जि.प.प्रा.शाळा चिंचोली ज. येथील कु.वेदिका गोविंद बेंडगे, जि.प.प्रशाला माडज येथील चि.मयुरेश महेश स्वामी, व लोहारा तालुक्यातील जि.प.प्रा.शाळा एकोंडी लो. येथील रूद्र संदीपान सुर्यवंशी, जि.प.प्रा.शाळा हिप्परगा रवा येथील जाधव स्वरांजली शरद या विद्यार्थ्यांनी नासा परिक्षेत यश संपादन केलेले आहे.
या कार्यक्रमासाठी विद्यार्थी सेनेचे संदीप चौगुले, मनोज जाधव, माजी पं.स. सदस्य भास्कर शिंदे यांच्यासह पालक व शिक्षक बांधव उपस्थित होते.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india