Best News Portal Development Company In India

उत्कृष्ट पोलीस पाटील म्हणून तानाजी माटे यांचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते विशेष सन्मान; महसूल दिनानिमित्त प्रशस्तीपत्र प्रदान!

उत्कृष्ट पोलीस पाटील म्हणून तानाजी माटे यांचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते विशेष सन्मान; महसूल दिनानिमित्त प्रशस्तीपत्र प्रदान!
​तुळजापूर प्रतिनिधी :-
दिनांक १८ ऑगस्ट २०२६ रोजी आयोजित करण्यात आलेल्या ‘महसूल दिन’ सोहळ्याच्या औचित्यावर नागराळ (लोहारा.) येथील पोलीस पाटील श्री. तानाजी ज्ञानेश्वर माटे यांना त्यांच्या उत्कृष्ट सेवा आणि उल्लेखनीय कार्याबद्दल मा. जिल्हाधिकारी (कलेक्टर साहेब) यांच्या शुभहस्ते सन्मानपूर्वक प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.
​तानाजी माटे हे नागराळ (लोहारा.) तालुका लोहारा येथे पोलीस पाटील म्हणून कर्तव्य बजावत असून, ते पोलीस पाटील संघटना (तालुका लोहारा) चे तालुकाध्यक्ष देखील आहेत. कायदा व सुव्यवस्था राखण्यासोबतच महसूल व पोलीस प्रशासनाला वेळोवेळी केलेले मोलाचे सहकार्य आणि सामाजिक बांधिलकी जपत त्यांनी केलेले कार्य अत्यंत कौतुकास्पद ठरले आहे. त्यांच्या याच उत्कृष्ट कामगिरीची दखल घेत जिल्हा प्रशासनाकडून हा बहुमान त्यांना प्रदान करण्यात आला.
​या विशेष सन्मानाबद्दल नागराळ ग्रामस्थ, लोहारा तालुक्यातील पोलीस पाटील संघटना, तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवरांकडून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
​पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा!
प्रशासन आणि समाज यांच्यातील महत्त्वाचा दुवा म्हणून काम करताना तानाजी माटे यांनी निर्माण केलेला हा आदर्श कौतुकास्पद आहे. त्यांना त्यांच्या पुढील सामाजिक व प्रशासकीय कार्यास मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा!

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india