Best News Portal Development Company In India

नळदुर्ग येथील बालगृहातून १४ वर्षीय मुलाचे अपहरण; अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल!

नळदुर्ग येथील बालगृहातून १४ वर्षीय मुलाचे अपहरण; अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल!
​तुळजापूर प्रतिनिधी:-
नळदुर्ग येथील ‘आपले घर बालगृह’ येथून १४ वर्षीय अल्पवयीन मुलाचे अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणासाठी पळवून नेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी नळदुर्ग पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
​मिळालेल्या माहितीनुसार, पृथ्वीराज हरी काळे (वय १४ वर्षे, मूळ रा. हुपरी, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर, सध्या रा. ‘आपले घर बालगृह’, नळदुर्ग) असे अपहरण झालेल्या मुलाचे नाव आहे.
​दिनांक १७ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी १२:३० ते १३:०० वाजण्याच्या सुमारास पृथ्वीराज यास बालगृहातून अज्ञात व्यक्तीने पळवून नेले. ही बाब लक्षात आल्यानंतर बालगृहाचे अधीक्षक संदीप राजेंद्र चवले (वय ३० वर्षे, रा. जेवळी, ता. लोहारा, जि. धाराशिव) यांनी नळदुर्ग पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली.
​संदीप चवले यांनी दिलेल्या प्रथम खबर (FIR) वरून, दिनांक १८ ऑगस्ट २०२६ रोजी नळदुर्ग पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १३७(२) अंतर्गत अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
​या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, नळदुर्ग पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत आणि मुलाचा शोध घेण्यासाठी विविध पथके रवाना करण्यात आली आहेत.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india