Best News Portal Development Company In India

RTO ई-चलानच्या नावाखाली ६.९१ लाखांचा ऑनलाईन गंडा; नळदुर्ग येथील तरुणाची सायबर भामट्यांकडून फसवणूक!

RTO ई-चलानच्या नावाखाली ६.९१ लाखांचा ऑनलाईन गंडा; नळदुर्ग येथील तरुणाची सायबर भामट्यांकडून फसवणूक!
​तुळजापूर प्रतिनिधी :-
RTO चलनाची बनावट लिंक पाठवून मोबाईलचा ॲक्सेस मिळवत सायबर भामट्यांनी एका तरुणाच्या बँक खात्यातून ६ लाख ९१ हजार ८०५ रुपये लांबवल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी धाराशिव सायबर पोलीस ठाण्यात अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नळदुर्ग (ता. तुळजापूर) येथील रहिवासी अफरोज रफीक कुरेशी (वय २४) यांच्या मोबाईलवर ‘Xpress Digital’ द्वारे +1 (555) 463-0581 या क्रमांकावरून एक संशयास्पद मेसेज आला होता. RTO चलान भरण्याच्या नावाखाली आरोपींनी एक लिंक (cutt.ly/pyp5BAWv) पाठवली. अफरोज यांनी सदर लिंकवरून ॲप ईन्स्टॉल करताच, भामट्यांनी त्यांच्या मोबाईलचा स्क्रीन/डिव्हाईस ॲक्सेस मिळवला. त्यानंतर त्यांच्या बँक खात्यातून टप्प्याटप्प्याने एकूण ६,९१,८०५ रुपये परस्पर पळवले.
फसवणूक झाल्याचे लक्षात येताच फिर्यादी अफरोज कुरेशी यांनी सायबर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. त्यांच्या प्रथम खबरेवरून १८ ऑगस्ट २०२६ रोजी सायबर पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३१-४ सह माहिती तंत्रज्ञान कायदा (IT Act) कलम ४३, ६६(सी), आणि ६६(डी) अन्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सायबर पोलीस करत आहेत.
​सायबर पोलिसांचे नागरिकांना आवाहन:
​अनोळखी लिंक टाळा: WhatsApp किंवा SMS द्वारे येणाऱ्या कोणत्याही अनधिकृत APK किंवा शॉर्ट लिंक्सवर क्लीक करू नका.
​RTO चलनाची खात्री करा: RTO चलान किंवा दंडाची माहिती नेहमी केवळ अधिकृत echallan.parivahan.gov.in या संकेतस्थळावरच तपासा.
​ॲक्सेस देवू नका: बँक तपशील, OTP किंवा मोबाईलचा Screen Sharing ॲक्सेस कोणालाही देवू नका.
​तक्रार नोंदवा: फसवणूक झाल्यास तात्काळ 1930 या सायबर हेल्पलाईन क्रमांकावर किंवा cybercrime.gov.in वर तक्रार करा.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india