दिनांक 12.1.2025 रोजी चोरी झालेल्या वडगाव काटी येथील सपाटे कुटुंबियांचे सोने चोरी केलेल्या तीन चोरट्यास अटक करण्यात आले.
या चोरी संदर्भात मिळालेली माहिती अशी की मौजे वडगाव काटी येथील रहिवासी सपाटे यांचे सोन्या-चांदीचे दागिने चोरीला गेले तक्रार तामलवाडी पोलीस स्टेशन येथे दाखल करण्यात आली.
अधिक तपास करत असताना. आरोपी बंडू उर्फ (बंदे नवाज) मधुकर पवार. राहणार ढोक बाभुळगाव तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर. याच्याकडे चौकशी केली असता. चोरट्याने गुन्हा कबूल करून त्याच्याकडील सोन्या चादीचे दागिने व ४ सोन्याच्या अंगठ्या असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
सदर कुणाचा तपास माननीय पोलीस अधीक्षक रितू खोखर, अप्पर पोलीस आयुक्त शपकत आमना धाराशिव, व तुळजापूर येथील श्री निलेश देशमुख साहेब उपविभागीय पोलीस अधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली गोकुळ ठाकूर, प्रदीप टेकाळे, जुबेर काझी, दिनकर ताकमोगे, बागबान व नरखेड पोलीस सलगर आणि गजगे यांच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली. पोलिसांच्या या कारवाईने चोरांवर जरब बसेल अशी आशा .नागरिकांमध्ये आहे.







