Best News Portal Development Company In India

खिशातून पडलेला मोबाईल काही महिन्यांनी मिळाला; पोलिसांच्या प्रयत्नांचे नागरिकांकडून कौतुक!

खिशातून पडलेला मोबाईल काही महिन्यांनी मिळाला; पोलिसांच्या प्रयत्नांचे नागरिकांकडून कौतुक

तुळजापूर | प्रतिनिधी

लातूर रोडवर मोटारसायकलवरून जात असताना खिशातून अचानक पडलेला मोबाईल काही महिन्यांनंतर पोलिसांच्या अथक प्रयत्नांमुळे पुन्हा मोबाईलधारकाच्या हाती लागला. पोलीस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल मारुती माळी यांनी केलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना यश आले.

लातूर रोडवर मोटारसायकलवरून जात असताना संबंधित नागरिकाच्या खिशातून अचानक मोबाईल रस्त्यावर पडला. काही अंतर पुढे गेल्यानंतर मोबाईल हरवल्याचे लक्षात येताच त्यांनी त्या क्रमांकावर कॉल केला. मात्र, त्यावेळी मोबाईल स्विच ऑफ करण्यात आला होता. त्यामुळे मोबाईलचा संपर्क होऊ शकला नाही. त्यानंतर संबंधित मोबाईलधारकाने पोलीस ठाण्यात मोबाईल गहाळ झाल्याची तक्रार दाखल केली.

तक्रारीची गांभीर्याने दखल घेत पोलिसांनी मोबाईलचा शोध घेण्यासाठी तपास सुरू केला. काही महिने उलटून गेल्यानंतरही पोलिसांनी या प्रकरणाचा पाठपुरावा सुरूच ठेवला. अखेर पोलीस कॉन्स्टेबल मारुती माळी यांच्या प्रयत्नांमुळे गहाळ झालेला मोबाईल शोधून काढण्यात पोलिसांना यश आले.

मोबाईल पुन्हा मिळाल्याने संबंधित नागरिकाला मोठा दिलासा मिळाला. यावेळी मोबाईलधारकाने पोलीस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे तसेच पोलीस कॉन्स्टेबल मारुती माळी यांचे विशेष आभार मानत त्यांच्या कार्याचे कौतुक केले. नागरिकांच्या तक्रारींची गांभीर्याने दखल घेऊन पाठपुरावा करत हरवलेल्या वस्तू परत मिळवून देण्याच्या पोलिसांच्या कार्याचे नागरिकांकडून कौतुक होत आहे.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india