Best News Portal Development Company In India

केंद्रप्रमुख कल्पना गुंजोटे, मुख्याध्यापक रजेद्र सरवदे यांना निरोप समारंभ तर मुख्याध्यापक रवी चिंचनसुरे, शिक्षक विजापुरे यांचा स्वागत समारोह उत्साहात संपन्न .

केंद्रप्रमुख कल्पना गुंजोटे, मुख्याध्यापक रजेद्र सरवदे यांना निरोप समारंभ तर मुख्याध्यापक रवी चिंचनसुरे, शिक्षक विजापुरे यांचा स्वागत समारोह उत्साहात संपन्न .
उमरगा/लोहारा प्रतिनिधी आदिनाथ भालेराव. (दि२०) उमरगा तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पेठ सांगवी येथील मुख्याध्यापिका कल्पना गुंजोटे(भुसारे) यांची केंद्रप्रमुख पदी निवड झाल्याबद्दल तसेच शिक्षक राजेंद्र सरवदे यांची मुख्याध्यापक पदी निवड झाल्याबद्दल त्यांना जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या वतीने निरोप समारंभ कार्यक्रमाच्या माध्यमातून निरोप देण्यात आला व पुढील कार्यासाठी त्यांचं अभिनंदन व मागील कामासाठी कौतुक करण्यात आले. निरोप समारंभ कार्यक्रमाच्या सुरुवातीला सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. निरोप समारंभ कार्यक्रमाचे अध्यक्ष शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संतोष पाटील हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून गावच्या प्रथम नागरिक कौसरबी शब्बीर मुजावर पुणे महानगरपालिकेचे माजी अभियंता एस के सुरवसे माजी सरपंच सदानंद जी बिराजदार तंटामुक्त समितीचे अध्यक्ष अमर यमगर शालेय व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष अहमद तांबोळी ग्रामपंचायतचे सदस्य संजय माळी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आले. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पेठ सांगवी येथे पहिल्यांदाच महिला मुख्याध्यापक म्हणून ज्यांनी अकरा महिन्याच्या कालावधीमध्ये संपूर्ण गावांमधील नागरिकांसोबत समन्वय साधत विद्यार्थ्यांच्या मनावरती शिक्षणाचे महत्व रुजवण्यामध्ये यशस्वी काम केले त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनामध्ये प्रिन्सिपल मॅडम हे शब्द खूपच आदरणीय असल्याचे दिसून आले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक चिंचणसुरे गुरुजी यांनी केले. आपल्या प्रस्ताविकामध्ये बोलत असताना मुख्याध्यापक म्हणाले की, जिल्हा परिषद शाळेमधील सर्व शिक्षक तसेच येथे येणारे पालक सुद्धा मुख्याध्यापक मॅडम यांच्या विषयी कुतूहलाने बोलत होते त्यामुळे एक अदरभाव निर्माण दिसून आला आणि खरोखरच आपल्या कामाचा ठसा आपण या ठिकाणी उमटवलेला आहे आणि पुढील केंद्रप्रमुख पदे आपली भरती झाल्यामुळे आपण केंद्रप्रमुख पदाला सुद्धा त्याच पद्धतीने न्याय द्याल यामध्ये कोणताही डाऊट नसल्याचे मुख्याध्यापक यांनी सांगितले आणि पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. सर्वप्रथम जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या वतीने व शालेय व्यवस्थापन समितीच्या वतीने मुख्याध्यापक पदावरून बढती मिळालेल्या केंद्रप्रमुख कल्पना गुंजोटे यांचा सन्मानशाल पुष्पहर व गिप्ट देऊन करण्यात आला.
यावेळी टाटा पावर स्वरूप संस्था तसेच शालेय व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष उमेश सुरवसे, व प्रकल्प शिक्षिका अंगुलमाला सुरवसे यांच्यावतीनेही बढती मिळालेले केंद्रप्रमुख कल्पना गुंजोटे, मुख्याध्यापक राजेंद्र सरवदे, पेठ सांगवी येथील मुख्याध्यापक रवी चिंचण सुरे, शिक्षक विजापुरे, यांचा सन्मान यावेळी शाल पुष्पहार व बाबासाहेब आंबेडकर लिखित भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ देऊन करण्यात आला. यावेळी केंद्रप्रमुख कल्पना गुंजोटे यांचा सत्कार प्रभावती रामचंद्र सुरवसे, उषा प्रेम कांबळे, संतोष पाटील, सरपंच कौसाबी मुजावर, शामल मुसंडे, शाळेतील सर्वच शिक्षक, तसेच शाळेतील सर्वच वर्गातील विद्यार्थ्यांनी मुख्याध्यापक राजेंद्र सरवदे व केंद्रप्रमुख कल्पना गुंजोटे यांचा सन्मान व पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यासाठी सातवीच्या विद्यार्थ्यांनी केक कापून त्यांचे अभिनंदन केले.
या निरोप समारंभ कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले शिक्षक कोथळीकर गुरुजी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून मुख्याध्यापक कल्पना गुंजोटे तसेच शिक्षक राजेद्र सरवदे यांच्या विषयी कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी आपल्या सत्काराला उत्तर देत असताना केंद्रप्रमुख कल्पना गुंजोटे म्हणाल्या की, मी या शाळेमधून बाहेर गेलेले असली तरी सुद्धा मी पेठ सांगवी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेसाठी अहोरात्र इथल्या विद्यार्थ्यांसाठी काम करणार आहे त्यामुळे कोणतेही विद्यार्थ्यांच्या अडीअडचणीसाठी त्यांनी माझ्याशी संपर्क करावा त्या अगोदर माझ्या शी ज्या प्रकारे आपण एकरूप राहिलात अनुपालन केला त्याच पद्धतीने येथील प्रत्येक शिक्षकांनी सांगितल्याने सुद्धा अनुपालन आपण करावं असा संदेश यावेळी केंद्रप्रमुख कल्पना गुंजोटी यांनी दिला.
तसेच गावातील गावकऱ्यांचे सुद्धा सहकार्य आपल्याला शाळेमध्ये वेळोवेळी लाभले आहेत त्यामुळे गावातील सर्वच नागरिकांनी आत्तापर्यंत ज्या प्रकारे सहकार्य केले आहेत तसेच सहकारी पुढील काळामध्ये सुद्धा आपल्या शाळेला करावे असेही यावेळी आवाहन केले.
मुख्याध्यापक राजेंद्र सरवदे सत्काराला उत्तर देत असताना म्हणाले की, शाळेतील तसेच सोबत असलेले मुख्याध्यापक सर्व शिक्षक तसेच गावातील प्रतिष्ठित व सर्वच विद्यार्थ्यांचे पालक यांच्या सहकाऱ्यांना विद्यार्थ्यांना योग्य शिक्षण देता आले त्याचबरोबर आपल्या सहकार्याने शाळेमध्ये वेळोवेळी अनेक कार्यक्रम घेता आले हे सहकार्य गावकऱ्यांनी केलेला आहे त्यामुळे शिक्षक स्टॉपसह गावकऱ्यांचे आभार व्यक्त करत राजेद्र सरवदे यांनी आपल्या अनेक आठवणींना यावेळी उजाळा दिला. यावेळी माजी मुख्याध्यापक लक्ष्मण सुभेदार गुरुजी पोलीस पाटील ईश्वर सुरवसे , एस के सुरवसे साहेब, आदींनी निरोप समारंभ कार्यक्रमातील केंद्रप्रमुख कल्पना गुंजेटे मुख्याध्यापक राजेंद्र सरवदे यांना निरोप देत त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या तर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये झालेली मुख्याध्यापक रवी चिंचणसुरे शिक्षक विजापुरे यांचेही यावेळी अभिनंदन केले.
यावेळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षक उमेश बिराजदार, प्रमिला झींगाडे, अर्चना साळुंखे, सुरेखा साळुंखे, तृप्ती पंडित, सक्षम चव्हाण, प्रकल्प शिक्षिका अंगुलमाला सुरवसे अदीची उपस्थिती होती. तर शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य संजय पाटील निळकठ राठोड महादु लोहार, याची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक मुख्याध्यापक चिंचणसुरे यांनी केले,कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सक्षम चव्हाण यांनी केली तर कार्यक्रमाचे आभार शालेय व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष उमेश सुरवसे यांनी मानले.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india