धाराशिव पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोकर मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली. धाराशिव जिल्ह्यातील पाळीव जनावरे चोरून नेऊन ती फलटण इंदापूर भिगवण येथील आठवडा बाजारात विकणारे चोरटे पेट्रोलिंग दरम्यान तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहिती द्वारे अटक करून जेरबंद करण्यात आले.
यातील आरोपी बुटा ठकसेन राहणार यते ता. फलटण याने त्याच्या साथीदार समवेत हा गुन्हा केल्याचे कबूल केले. सुरुवातीस चौकशी केली असता त्यांनी उडवा उडवीची उत्तरे दिली. नंतर विश्वासात घेऊन चौकशी केली असता ऋषिकेश पिंटू जगताप राहणार खोबली.ता. फलटण हा सातारा येथे पकडला गेला त्याच्याकडून माहिती मिळवून इतर दोन आरोपींना पकडले. बारामती येथील आठवडा बाजार जनावरे विक्रीसाठी आणणार अशी माहिती मिळवून योग्य सापळा लावून कारवाई केली. या कारवाईत 3 म्हशी आणि पिकप वाहन असा 7,30,000रू किमतीचा मुद्देमाल जप्त केला.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोखर धाराशिव यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. विनोद पवार पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा धाराशिव, सचिन खटके, सहाय्यक पोलीस निरीक्षक हवालदार विनोद जाणार आहोत, नितीन जाधवर, पोलीस नायक बबन जाधवर, चालक पोलीस हवालदार प्रशांत किंवडे यांच्या संयुक्त पथकाने केली आहे.






