नर्चर अँड पीस फाउंडेशनतर्फे आमदार प्रवीण स्वामी यांना दिल्लीत मानद डॉक्टरेट पदवी प्रदान..
उमरगा/लोहारा प्रतिनिधीआदिनाथ भालेराव.
शिक्षण, सामाजिक कार्य आणि राजकीय क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल तसेच लोकसेवेप्रती असलेल्या निष्ठेची दखल घेत दिल्ली येथे आयोजित ‘गौरव सन्मान सोहळ्या’त आमदार प्रवीण स्वामी यांना ‘नर्चर अँड पीस फाउंडेशन’तर्फे (Nurture and Peace Foundation) मानद डॉक्टरेट (Honorary Doctorate)
या प्रतिष्ठित पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
दिल्लीतील या विशेष कार्यक्रमात आमदार प्रवीण स्वामी यांच्यासह प्रमुख पाहुणे म्हणून दिल्लीतील ज्येष्ठ पत्रकार श्री निशांत शर्मा,श्रीम प्रियांका अरोरा,
डॉ सुरुची शर्मा,
मंजीत कुमार उपस्थित होते.
या सोहळ्याला आरोग्यदूत श्री मंगेश चिवटे यांची विशेष उपस्थिती लाभली होती.
आपल्या भावना व्यक्त करताना प्रवीण स्वामी म्हणाले, “हा सन्मान माझ्यासाठी केवळ एक पुरस्कार नसून, समाजासाठी अधिक जबाबदारीने आणि समर्पणाने काम करण्याची प्रेरणा आहे. हा गौरव माझा वैयक्तिक नसून उमरगा–लोहारा मतदारसंघातील जनतेने माझ्यावर दाखवलेल्या विश्वासाचा, प्रेमाचा आणि आशीर्वादाचा सन्मान आहे. मतदारसंघातील नागरिकांचा हा विश्वास हीच माझी खरी ताकद असून जनसेवा हीच माझी अंतिम बांधिलकी आहे.”
समाजात सकारात्मक परिवर्तन घडवून आणण्यासाठी आणि लोकसेवेसाठी सदैव तत्पर राहण्याचा संकल्प त्यांनी याप्रसंगी बोलताना व्यक्त केला.
या सन्मानाबद्दल उमरगा–लोहारा मतदारसंघातील नागरिक व कार्यकर्त्यांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.








