Best News Portal Development Company In India

हिवरा यवतमाळ येथे धाराशिव,लातुर,बीड,विनानपरिषदेचे आमदार बसवराज पाटील यांनी घेतले एकविरा देवीचे दर्शन!

हिवरा यवतमाळ येथे धाराशिव,लातुर,बीड,विनानपरिषदेचे आमदार बसवराज पाटील यांनी घेतले एकविरा देवीचे दर्शन.
उमरगा/लोहारा प्रतिनिधी आदिनाथ भालेराव.
अष्टादश शक्तिपीठांपैकी एक असलेल्या श्री एकविरा देवी मातेचे मनोभावे दर्शन आमदार बसवराज पाटील यांनी घेतले. यावेळी सर्व जनतेच्या सुख, समृद्धी व कल्याणासाठी मातेच्या चरणी आ.पाटील यांनी प्रार्थना व्यक्त केली.
याप्रसंगी देवस्थानच्या विश्वस्त मंडळाने आमदार बसवराज पाटिल यांचा यथोचित स्वागत-सत्कार करून, शुभेच्छा दिल्या.
यावेळी शिरीषअप्पा उटगे, बसवराज धाराशिवे, प्रकाश आष्टे आणि दिलीप भालेराव उपस्थित होते.
याप्रसंगी देवस्थानचे विश्वस्त व विदर्भ बैलगाडा शर्यत संघटनेचे अध्यक्ष तथा माजी जिल्हा परिषद सदस्य साहेबराव पाटील कदम (हिवरेकर), भाजपा तालुकाध्यक्ष श्री. योगेश वाजपेयी, शिवसेना महागाव तालुका प्रमुख तथा माजी नगरपंचायत सभापती राजू राठोड, माजी सरपंच प्रवीण जामकर, महागाव तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष महेश कामारकर, मनसे तालुकाध्यक्ष सुनील चव्हाण, श्री. विनोद खोंडे, देवेंद्र कदम, शैलेश पेंटावाड, माजी ग्रामपंचायत सदस्य विलास कोथले, सुधाकर जामकर, पप्पू राऊत, शसंदीप खोंडे, वैभव कोत्ताकोंडावार आदी मान्यवर उपस्थित होते.
श्री एकविरा मातेचा आशीर्वाद सर्व जनतेवर सदैव राहो,हीच सद्भावना आमदार पाटील यांनी व्यक्त केले.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india