Best News Portal Development Company In India

विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी घेतले तुळजाभवानी देवीचे दर्शन; मंदिर परिसरातील विकासकामांची केली पाहणी!

विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी घेतले तुळजाभवानी देवीचे दर्शन; मंदिर परिसरातील विकासकामांची केली पाहणी!
​तुळजापूर प्रतिनिधी:-
छत्रपती संभाजीनगर विभागाचे विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी तुळजापूर दौऱ्यादरम्यान श्री तुळजाभवानी देवीचे दर्शन घेऊन विधिवत आरती केली. तुळजापूर येथे आयोजित जिल्हास्तरीय विविध विभागांच्या आढावा बैठकीच्या अध्यक्षतेसाठी ते आले होते.
​दर्शनानंतर विभागीय आयुक्तांनी मंदिर परिसरात सुरू असलेल्या विविध विकासकामांची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांनी कामांची सद्यस्थिती, प्रगती आणि पुढील नियोजनाचा सविस्तर आढावा घेतला.
​या दौऱ्याप्रसंगी श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या वतीने विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांचा भावपूर्ण सत्कार करण्यात आला. मंदिर संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्या हस्ते त्यांना कवड्याची माळ आणि श्री तुळजाभवानी देवीची प्रतिमा देऊन सन्मानित करण्यात आले.
​या वेळी तहसीलदार तथा मंदिर संस्थानचे विश्वस्त अरविंद बोळंगे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india