Best News Portal Development Company In India

*श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयात विद्यापीठ वर्धापन दिनानिमित्त इन्क्युबेशन सेंटर चे उद्घाटन!

*श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयात विद्यापीठ वर्धापन दिनानिमित्त इन्क्युबेशन सेंटर चे उद्घाटन*

उमरगा /लोहारा प्रतिनिधी आदिनाथ भालेराव.
(दि.२३)येथील श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वर्धापन दिनानिमित्त करिअर कट्टाच्या अंतर्गत इन्क्युबेशन सेंटर चे
उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय अस्वले यांच्या हस्ते करण्यतआले.

भारतरत्न डॉ .बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाच्या६८ व्या वर्धापन दिनानिमित्त प्राचार्य डॉ अस्वले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
महाराष्ट्र राज्य उच्च आणि तंत्र शिक्षण विभाग , महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र आयोजित करीअर कट्टा अंतर्गत विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकतेची भावना निर्माण करणे, त्यांच्या नाविन्यपूर्ण कल्पनांना योग्य दिशा देणे, स्टार्टअपच्या माध्यमातून रोजगारनिर्मितीच्या संधी उपलब्ध करून देणे तसेच विद्यार्थ्यांना उद्योग व व्यवसाय क्षेत्रासाठी आवश्यक कौशल्यांचे मार्गदर्शन मिळावे, या उद्देशाने इन्क्युबेशन सेंटर सुरू करण्यात आले आहे.
यावेळी प्राचार्य डॉ. संजय अस्वले यांनी विद्यार्थ्यांनी केवळ नोकरीचा शोध न घेता स्वतःच्या नाविन्यपूर्ण कल्पनांच्या माध्यमातून उद्योजक बनण्याचा प्रयत्न करावा, इन्क्युबेशन सेंटरच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना त्यांच्या कल्पनांचे प्रकल्प व व्यवसायामध्ये रूपांतर करण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन मिळणार आहे.असे आवाहन केले.
या उद्घाटन प्रासंगिक
यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय अस्वले, उपप्राचार्य डॉ. विनोद देवरकर, उपप्राचार्य डॉ. पद्माकर पिटले, प्रा. जी. एस. मोरे आणि पर्यवेक्षक शैलेश महामुनी प्रभारी प्राध्यापक डॉ एस पी इंगळे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी इंक्युबेशन सेंटरचे समन्वयक डॉ. अशोक पदमपल्ले, सहसमन्वयक डॉ. श्रीशैल्य तोडकर, करिअर कट्ट्याचे डॉ. चंद्रसेन करे, डॉ. समाधान पसरकल्ले, डॉ. अर्जुन कटके, महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india