Best News Portal Development Company In India

उमरग्यात ४० किलो गोमांसासह १.५८ लाखांचा मुद्देमाल जप्त; पिकअप चालकावर गुन्हा दाखल!

उमरग्यात ४० किलो गोमांसासह १.५८ लाखांचा मुद्देमाल जप्त; पिकअप चालकावर गुन्हा दाखल!
तुळजापूर प्रतिनिधी :-
बेकायदेशीरपणे आणि विनापरवाना प्राण्यांची कत्तल करून मांसाची वाहतूक करणाऱ्या एका आरोपीवर उमरगा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस पथकाने धडक कारवाई करत ४० किलो गोमांसासह एक पिकअप वाहन जप्त केले असून एकूण १ लाख ५८ हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे.
​कारवाईचा तपशील-
ही कारवाई दिनांक २२ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी सुमारे ०८:५० वाजण्याच्या सुमारास कसगी येथील बसवेश्वर चौकात, उमरगा ते अळंद जाणाऱ्या रस्त्यावर करण्यात आली. उमरगा पोलीस ठाण्याच्या पथकाला मिळालेल्या माहितीच्या आधारे ही नाकेबंदी करण्यात आली होती.
​आरोपीचे नाव- इरफान मजहर कुरेशी (वय २६ वर्ष, रा. गुंजोटी, ता. उमरगा, जि. धाराशिव)
​जप्त वाहन: पिकअप क्रमांक MH 25 AJ 2414 (किंमत ₹१,५०,०००/-)
​जप्त मांस: ४० किलो गोवंशीय जनावरांचे मांस (किंमत ₹८,०००/-)
​एकूण जप्त मुद्देमाल: ₹१,५८,०००/-
​आरोपी आपल्या वाहनातून अत्यंत निर्दयपणे कत्तल केलेल्या गोवंशीय मांसाची विक्रीच्या उद्देशाने बेकायदेशीर वाहतूक करत असताना रंगेहाथ सापडला. या प्रकरणी उमरगा पोलिसांनी सरकारतर्फे आरोपीविरुद्ध प्राणी संरक्षण अधिनियम कलम ५(क), ५(ड) आणि ९(अ) अन्वये गुन्हा नोंदवला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india