उमरग्याचे उध्योजक नागनाथ (अप्पा) कुंभार यांच्या नातवाचा जगात डंका – आजोबाच्या डोळ्यात आनंदाश्रू ! उमरगा /लोहारा प्रतिनिधी आदिनाथ भालेराव.
तालुक्यातील कोरेगांववाडी येथील उद्योजक नागनाथ (अप्पा)कुंभार यांचा नातू हर्ष विजय कुंभार याची चनई येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय कराटे क्रिडा प्रकारात वर्ल्ड गिनिज बुकात नोंद झाली. हर्ष चा कोरेगांववाडी ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला. नातवाने केलेल्या जागतिक दर्जाच्या कामगिरीने आजोबा नागनाथ कुंभार भारावून गेले. नातवाने जगात डंका गाजवला अन् आजोबांच्या डोळ्यात आनंदाश्रू आल्याचे दिसून आले.
तालुक्यातील कोरेगांववाडी येथील अखिल भारतीय कुंभार प्रजापती समाज संघटेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष नागनाथ कुंभार यांचे चिरंजीव विजय कुंभार यांचे सुपुत्र हर्ष कुंभार याने वयाच्या सातव्या वर्षी चनई येथे मोस्ट पीपल्स परफार्मिंग कराटे चोप टाइन सिम्युल्टसली यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कराटे या क्रिडा प्रकारात उत्कृष्ट कामगिरी केली.हर्ष कुंभार याच्या कराटे कामगिरीची गिनिज वर्ल्ड बुकात नोंद झाली. त्या बद्दल कोरेगांववाडी ग्रामस्थांच्या वतीने त्याचा सत्कार समारंभ संपन्न झाला.
हर्ष कुंभार याची कोरेगांववाडी गावांतून लेझिम – ढोल ताशांच्या गजरात भव्य मिरवणूक काढण्यात आली.
कोरेगांववाडी ग्रामपंचायतीच्या वतीने उपसरपंच अनंत लवटे , माजी मुख्याध्यापक प्रकाश भोंडगे, शरणाप्पा कुंभार , अरविंद पाटील , विलास विभूते , दिगंबर सुरवसे, मारुती कोडते , सदानंद कुंभार , श्रीकृष्ण शिक्षण संस्थेच्या वतीने सोमशंकर कुंभार सह आदिंच्या वतीने सत्कार करण्यात आला.
या वेळी बोलताना उद्योजक नागनाथ (अप्पा) कुंभार म्हणाले कि – माझ्या गरीब परिस्थिती मुळे शिक्षण घेता आले नाही. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करून कष्टाचे जीवन जगावे लागले. मनाचा प्रामाणिक पणा आणि कष्ट हिच आयुष्याची कमाई आहे. शिक्षणाचा माझ्या जीवनात जरी अभाव असला तरी माझा नातू हर्ष यांने जागतिक स्तरावर दैदिप्यमान यश मिळविले याचा मला खूप आनंद आहे. असे सांगताना त्यांच्या भावना अनावर होऊन त्यांच्या डोळ्यातील आनंदाश्रूना वाट मोकळी करून दिली.
या वेळी अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांचे ” तुकाराम ” हे पुस्तक देऊन महेश कुंभार यांनी मुंडे यांच्या आदर्शवत जीवनाचा आदर्श जपण्याचा सल्ला दिला.जी.के .इंटरनॅशनल स्कूलच्या वतीने गणेश केशवशेट्टी यांनी सत्कार केला. चिमुकल्या हर्ष चे कौतुक करण्या साठी सर्व गाव एक झाला होता. गावात सर्वज स्वागत कमानी व चौकाचौकात बॅनर लावून त्याचे स्वागत करण्यात आले. नातवाने आजोबाचे नाव संपूर्ण जगाच्या पाठीवर पोहविल्या मुळे आजोबाच्या डोळ्यात आलेले आनंदाश्रू बघून “नातवाचा जगात डंका अन् आजोबाच्या डोळ्यात आनंदाश्रू अशीच कृतज्ञता ग्रामस्थांतून ऐकाण्यास मिळाली .
प्रास्ताविक विजय कुंभार यांनी केले. सुजसंचलन सोमशंकर कुंभार यानी केले. आभार महेश कुंभार यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी धनराज करके, विठ्ठल माने सह कोरेगाववाडी ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले .








