Best News Portal Development Company In India

*राज्यस्तरीय थ्रो बॉल स्पर्धेत कोल्हापूर जिल्ह्याला उपविजेतेपद

*राज्यस्तरीय थ्रो बॉल स्पर्धेत कोल्हापूर जिल्ह्याला उपविजेतेपद*

बारामती येथे महा थ्रो बॉल असोसिएशनच्या वतीने आयोजित तिसऱ्या राज्यस्तरीय थ्रो बॉल स्पर्धेत कोल्हापूर जिल्ह्याच्या संघाने उत्कृष्ट कामगिरी करत उपविजेतेपद पटकावले.

या स्पर्धेत कोल्हापूर जिल्ह्याचा संघ ‘ब’ गटात होता. साखळी फेरीत कोल्हापूरची धुळे, नागपूर, पुणे आणि नंदुरबार या जिल्ह्यांच्या संघांशी लढत झाली. या सर्व सामन्यांमध्ये कोल्हापूर जिल्ह्याच्या संघाने एकतर्फी विजय मिळवत गटात प्रथम क्रमांक पटकावला आणि नॉकआऊट फेरीसाठी पात्रता मिळवली.

उपांत्यपूर्व (क्वार्टर फायनल,नॉकआऊट) सामन्यात कोल्हापूरचा सामना रत्नागिरी जिल्ह्याशी झाला. या सामन्यात कोल्हापूरने रत्नागिरीचा पहिला सेट 15-8 व 15-6 अशा फरकाने पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला.

उपांत्य फेरीत कोल्हापूर जिल्ह्याची लढत पुणे शहर संघाशी झाली. या सामन्यात कोल्हापूरने पहिला सेट 15-8 आणि दुसरा सेट 15-12 अशा फरकाने जिंकत अंतिम फेरीत दिमाखात प्रवेश केला.

अंतिम सामन्यात कोल्हापूर जिल्ह्याची लढत सांगली जिल्ह्याच्या संघाशी झाली. अत्यंत चुरशीच्या झालेल्या या सामन्यात पहिला सेट सांगलीने 15-12 असा जिंकला. दुसऱ्या सेटमध्ये कोल्हापूरने जोरदार पुनरागमन करत 15-13 असा विजय मिळवला. मात्र अंतिम सामन्यातील एकूण कामगिरीच्या आधारे सांगली जिल्ह्याने विजेतेपद पटकावले आणि कोल्हापूर जिल्हा संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.

कोल्हापूर जिल्ह्याच्या संघाने संपूर्ण स्पर्धेत केलेल्या दमदार कामगिरीबद्दल संघातील खेळाडू, प्रशिक्षक व व्यवस्थापकांंचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. या यशामुळे कोल्हापूर जिल्ह्याच्या थ्रो बॉल संघाने राज्यस्तरावर आपल्या खेळाचा ठसा उमटवला आहे.
उपविजयी संघाला महा थ्रोबाँल असोसिएशन चे अध्यक्ष दर्शिल कोटक यांच्या हस्ते चषक व मेडल देऊन गौरविण्यात आले. यावेळी महा थ्रोबाँल असोसिएशन चे सचिव राहुल वाघमारे,विसावा रिसाँर्ट पालघरचे संचालक अश्विनकुमार पाचाळ व हँलो ग्रुप पालघरच्या संचालिका सुकृती पांचाळ पुणे जिल्हा असोसिएशन चे सचिव जयदीप तांबवेकर,चंद्रकांत घोडेराव,संदीप जाधव कोल्हापूर जिल्हा सचिव यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
सदर संघास जिल्हा संघटनेचे अध्यक्ष दत्तात्रय घुगरे, क्रीडा अधिकारी अरुण पाटील यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले.

संघातील खेळाडू :– समर्थ बोराटे, संचित बेनिचेडगे, प्रतीक घोगले, राज माने, स्वराज जगताप, निखिल सूर्यवंशी, अरुष डब्बे, योगेश बोरगावे, सार्थक मस्के, सर्वाद्य मचाले, *शंभूराजे मिटकर,* हेमंत चौधरी, श्रीनिवास सराबी, उद्धव कुंभार, प्रशिक्षक :- प्रथमेश तोडकर, व्यवस्थापक :- सौमिल्य पाटील.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india