Best News Portal Development Company In India

औसा येथील विरनाथ मल्लनाथ संस्थानचे गुरुवर्य गुरुबाबा महाराज व सद्गुरू गहिनीनाथ महाराज यांच्या मातोश्री चे निधन शोकामुळे आमदार बसवराज पाटील यांनी घेतली सांत्तवन पर भेट.

औसा येथील विरनाथ मल्लनाथ संस्थानचे गुरुवर्य गुरुबाबा महाराज व सद्गुरू गहिनीनाथ महाराज यांच्या मातोश्री चे निधन शोकामुळे आमदार बसवराज पाटील यांनी घेतली सांत्तवन पर भेट.
उमरगा/लोहारा प्रतिनिधी आदिनाथ भालेराव.
श्री समर्थ सच्चिदानंद सद्गुरु वीरनाथ मल्लनाथ महाराज संस्थान, श्रीक्षेत्र औसा येथील गुरुवर्य ह.भ.प. श्री. गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या निवासस्थानी विधान परिषदेचे आमदार बसवराज पाटील यांनी कुटुंबियांची भेट घेऊन त्यांच्या मातोश्री पूजनीय लिलाबाई ज्ञानेश्वर महाराज औसेकर यांच्या निधनाबद्दल सांत्वन केले व भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
पूजनीय लिलाबाई ज्ञानेश्वर महाराज औसेकर यांचे संपूर्ण जीवन अध्यात्म, भक्ती, सेवा, संस्कार आणि ममत्वाने समृद्ध होते. त्यांच्या प्रेमळ, वात्सल्यपूर्ण व स्नेहशील व्यक्तिमत्त्वामुळे असंख्य भक्तांच्या मनात त्यांनी अढळ स्थान निर्माण केले होते.
त्यांच्या निधनाने औसा येथील आध्यात्मिक व भक्तीपरंपरेसह औसेकर कुटुंबीय, अनुयायी आणि भक्त परिवारावर दुःखाचा मोठा आघात झाला आहे असे ही आ.पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त करुन .
या दुःखद प्रसंगी ईश्वर त्यांच्या कुटुंबीयांना दुःख सहन करण्याची शक्ती देवो.अशी श्रद्धांजली अर्पण केली.
गुरुवर्य ह.भ.प गुरुबाबा महाराज औसेकर, हभप श्रीरंग महाराज औसेकर, हभप रवी महाराज, गोरखनाथ महाराज, बसंतराव देशमुख महाराज तसेच बीव्ही मोतीपोवळे, शिरीषप्पा उटगे, संगमेश्वर ठेसे, बसवराज धाराशिवे, ओम मोतीपोवळे, दिलीप भालेराव, प्रणिल उटगे, मेघराज बरबडे, महालिंग मंठाळे आदि उपस्थित होते.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india