Best News Portal Development Company In India

सुरेश भिसे यांच्यावरील खोटे आरोप आणि बदनामीचा प्रयत्न; ‘भीम अण्णा संघटने’चा पत्रकार परिषदेत जाहीर निषेध!

सुरेश भिसे यांच्यावरील खोटे आरोप आणि बदनामीचा प्रयत्न; ‘भीम अण्णा संघटने’चा पत्रकार परिषदेत जाहीर निषेध!
तुळजापूर प्रतिनिधी:-
भीम अण्णा सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सुरेश (आप्पा) भिसे यांच्यावर करण्यात आलेले सर्व आरोप बिनबुडाचे, खोडसाळ आणि दिशाभूल करणारे असून, या प्रकाराचा संघटनेच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला आहे. संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पत्रकार परिषद घेऊन आरोपांचे खंडन केले असून सत्य परिस्थिती माध्यमांसमोर मांडली आहे.
पत्रकार परिषदेत मांडलेले महत्त्वाचे मुद्दे-
सामाजिक कार्याची बदनामी करण्याचा कट(जिल्हा परिषद विद्यमान सदस्य) दयानंद शिंदे यांनी सुरेश(आप्पा) भिसे यांच्यावर ‘गावगुंड’ आणि महिलांचे पैसे खाल्ल्याचा आरोप केला आहे. हे आरोप पूर्णपणे खोटे आणि मनगढंत आहेत. सुरेश भिसे यांचे सामाजिक कार्य आणि समाजात वाढत असलेला मान-सन्मान काहींना सहन होत नसल्यामुळेच त्यांची बदनामी केली जात आहे.
चोरीचे आरोप निराधार- ‘सुरेश भिसे चोरी करतात’ या आरोपाचा तीव्र शब्दांत समाचार घेण्यात आला. महाराष्ट्रात कोणत्याही पोलीस ठाण्यात सुरेश भिसे यांच्यावर चोरीचा गुन्हा दाखल आहे का, असा सवाल करत हा आरोप सिद्ध करून दाखवण्याचे आव्हान देण्यात आले आहे.
अ‍ॅट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर नाही- सुरेश भिसे हे खोट्या अ‍ॅट्रॉसिटी केसेस दाखल करून समाजात तेढ निर्माण करतात, हा आरोप निव्वळ बालिशपणाचा आहे. वास्तवात जेव्हा समाजातील पीडित बांधवांवर विनाकारण अन्याय आणि मारहाण होते, तेव्हा न्यायासाठी पोलीस ठाण्यात जाणे हा त्यांचा हक्क आहे. अन्याय सहन करून गप्प बसणे शक्य नाही.
सुरेश (आप्पा)भिसे यांच्या वाढत्या सामाजिक लोकप्रियतेला आणि कार्याला गालबोट लावण्यासाठीच असे बिनबुडाचे आरोप केले जात असल्याचे सांगत संघटनेने या बदनामीकारक कृत्याचा कडक शब्दांत निषेध केला आहे.
सदरील पत्रकार परिषदेस भीमा – अण्णा संघटनेचे लातूर जिल्हा अध्यक्ष अमर कांबळे ,मयूर साळुंखे (औसा तालुका अध्यक्ष), राम कांबळे (तुळजापूर तालुका अध्यक्ष) ,जयराज झोंबाडे विरोधी ( जिल्हा परिषद उमेदवार)तसेच असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india