Best News Portal Development Company In India

वाणिज्य मंडळाचा उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न! उमरगा/लोहारा प्रतिनिधी आदिनाथ भालेराव.

वाणिज्य मंडळाचा उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न!

उमरगा/लोहारा प्रतिनिधी आदिनाथ भालेराव.
दि. २५ : भारत शिक्षण संस्था उमरगा संचलित श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयातील वाणिज्य विभागाच्या वतीने शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी वाणिज्य मंडळाचा उद्घाटन सोहळा मंगळवारी महाविद्यालयाच्या सभागृहात उत्साहात पार पडला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोकमान्य महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. बी. बी. जाधव होते. आर. पी. महाविद्यालयाचे माजी प्राचार्य प्रा. डॉ. रमेश दाबके यांच्या हस्ते वाणिज्य मंडळाचे उद्घाटन करण्यात आले. प्रमुख मार्गदर्शक म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय अस्वले उपस्थित होते.

यावेळी प्रा. डॉ. रमेश दाबके म्हणाले, “वाणिज्य शिक्षणातून विद्यार्थ्यांनी केवळ पदवी न घेता बदलत्या उद्योग-व्यवसाय क्षेत्रासाठी आवश्यक कौशल्ये आत्मसात करावीत. डिजिटल तंत्रज्ञान, ई-कॉमर्स, बँकिंग, वित्तीय सेवा, डिजिटल मार्केटिंग आणि उद्योजकता या क्षेत्रांत मोठ्या संधी आहेत. विद्यार्थ्यांनी या संधींचा लाभ घेऊन रोजगारासोबतच स्वयंरोजगाराच्या दिशेनेही वाटचाल करावी.”

प्राचार्य डॉ. संजय अस्वले यांनी विद्यार्थ्यांनी वाणिज्य मंडळाच्या विविध उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेऊन नेतृत्व व कौशल्यविकास साधावा, असे आवाहन केले. डॉ. अजित अष्टे यांनी प्रास्ताविकातून मंडळाच्या वर्षभरातील उपक्रमांची माहिती दिली.

यावेळी उपप्राचार्य डॉ. विनोद देवरकर, प्रा. डॉ. सुभाष इंगळे, प्रा. डॉ. पी. ए. पिटले, डॉ. खंडू मुरलीकर, डॉ. विजयकुमार मुळे यांच्यासह वाणिज्य विभागातील प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन कु. पूजा हांडे हिने केले, तर वैशाली कदम हिने आभार मानले.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india