रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष राजाभाऊ सरवदे यांना वाढदिवसाच्या भरभरून शुभेच्छा!
तुळजापूर प्रतिनिधी:-
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आरपीआय) महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष राजाभाऊ सरवदे यांचा आज वाढदिवस. त्यानिमित्त रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे धाराशिव जिल्हा कार्याध्यक्ष बाबासाहेब म्हस्के यांच्याकडून त्यांचा जाहीर सत्कार तसेच संपूर्ण महाराष्ट्रातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. पक्षाचे कार्यकर्ते, विविध क्षेत्रांतील मान्यवर, राजकीय नेते आणि हितचिंतक त्यांना उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा देत आहेत.
समाजातील वंचित, शोषित आणि दुर्बल घटकांच्या हक्कासाठी राजाभाऊ सरवदे यांनी सदैव पुढाकार घेतला आहे. पक्षाची संघटनात्मक बांधणी मजबूत करण्यात आणि रिपब्लिकन विचारांचा प्रचार-प्रसार करण्यात त्यांचे योगदान मोलाचे राहिले आहे. सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर आक्रमकपणे आवाज उठवणारे अभ्यासू आणि लोकभिमुख नेतृत्व म्हणून त्यांची ओळख आहे.
त्यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभरात विविध सामाजिक उपक्रम, रक्तादान शिबिरे आणि गरजू वस्तूंचे वाटप अशा कार्यक्रमांचे आयोजन कार्यकर्त्यांकडून करण्यात आले आहे.
समाजाच्या सेवेसाठी आणि बहुजन हिताच्या लढ्यासाठी राजाभाऊ सरवदे यांना दीर्घायुष्य लाभो, याच रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.
याप्रसंगी रिपाइं धाराशिव जिल्हा कार्याध्यक्ष बाबासाहेब म्हस्के, नगर नगरपरिषद नगरसेवक मारुती खारवे, तुळजापूर तालुका अध्यक्ष अरुण लोखंडे, जिल्हा सचिव एस. के. गायकवाड,रिपाइं तुळजापूर तालुका उपाध्यक्ष किसन पांडागळे, रिपाइं ओबीसी आघाडी तुळजापूर शहराध्यक्ष लहुजी घोडके, रिपाइं नळदुर्ग सर्कल प्रमुख राजेंद्र शिंदे सह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.







