श्री विठ्ठलसाईचे रोलर पुजन आ. बसवराज पाटील यांच्या हस्ते संपन्न
उमरगा/लोहारा आदिनाथ भालेराव.
(दि.२८) – श्री विठ्ठलसाई स.सा.का.लि, मुरुम कारखान्याच्या गळीत हंगाम २०२६-२७साठीचे रोलरचे पुजन माजी मंत्री तथा कारखान्याचे चेअरमन मा.आ.श्री.बसवराजजी पाटील साहेब यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना श्री पाटील साहेब म्हणाले की, सध्या कारखाना कार्यक्षेत्रात साधारणतः १८,००० हेक्टर क्षेत्राची ऊसाची लागवड झाली आहे. अपूरा पर्जन्यमान असला तरी कार्यक्षेत्रात मोठ्या प्रमाणात ऊसाची उपलब्धता आहे. हंगाम २०२६-२७ मध्ये कारखाना कार्यक्षेत्रातील संपूर्ण ऊसाचे वेळेवर गाळप केले जाईल. तसेच सक्षम ऊस तोडणी वाहतूक यंत्रणा भरणा करण्यात आली आहे. कारखाना मशिनरी दुरुस्तीची कामे पुर्ण करण्यात येत असून ऊस उत्पादक व सभासदांनी जास्तीत जास्त ऊस देवून सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले. याप्रसंगी मुरुम नगरपरिषद चे नगराध्यक्ष तथा जिल्हा बँकेचे अध्यक्ष मा.श्री. बापुरावजी पाटील साहेब, उमरगा जनता सहकारी बँकेचे चेअरमन मा.श्री. शरणजी पाटील साहेब कारखान्याचे सर्व संचालक शरण्णप्पा पत्रिके, केशवराव पवार, शिवलिंग माळी, व रविंद्र चव्हाण, गणेश अंबर, नागनाथ पत्रिके, अँड. विश्वनाथ पत्रिके, सुजित शेळके, बबन बनसोडे, सतिश पवार, संजीव पाटील, शाहुराज डोके, प्रकाश आष्टे, सचिन पाटील, नितीन रेड्डी चाकुर जिल्हा सरचिटणीस नगरसेवक, उमाकांतप्पा शेटे, शहर चिटणीस आदीसह कारखान्याचे कार्यकारी संचालक श्री. एस.आर. गवसाणे, कारखान्यातील सर्व अधिकारी, कर्मचारी व कामगार, ऊस उत्पादक शेतकरी, सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.






