Best News Portal Development Company In India

तुळजापूर बसस्थानकावर गर्दीचा फायदा घेत महिलेचे ५० हजारांचे सोन्याचे गंठण लांबवले; अज्ञातावर गुन्हा दाखल!

तुळजापूर बसस्थानकावर गर्दीचा फायदा घेत महिलेचे ५० हजारांचे सोन्याचे गंठण लांबवले; अज्ञातावर गुन्हा दाखल!
​तुळजापूर प्रतिनिधी:-
जुन्या तुळजापूर बसस्थानकावर बसमध्ये चढताना गर्दीचा गैरफायदा घेऊन अज्ञात चोराने एका महिलेच्या गळ्यातील ५० हजार रुपये किमतीचे सोन्याचे मिनी गंठण पळवल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी तुळजापूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
​मिळालेल्या माहितीनुसार, धाराशिव येथील संविधान कॉलनी (तांबरी विभाग) येथील रहिवासी राधा उमाकांत भोसले (वय ४० वर्ष) या आपल्या मैत्रिणीसोबत प्रवास करत होत्या. जुने तुळजापूर बसस्थानक येथे दुपारी १२:०० ते १३:०० वाजेच्या सुमारास उमरगा ते छत्रपती संभाजीनगर धावणाऱ्या बसमध्ये त्या चढत असताना ही घटना घडली.
​बसमध्ये चढताना स्थानकावर असलेल्या गर्दीचा फायदा घेत अज्ञात भामट्याने भोसले यांच्या गळ्यातील ५०,००० रुपये किमतीचे सोन्याचे मिनी गंठण चालाखीने चोरून नेले. दागिना चोरीला गेल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्यांनी तात्काळ पोलिसांत तक्रार नोंदवली.
​याप्रकरणी राधा भोसले यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरून (FIR) तुळजापूर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०३(२) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तुळजापूर पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india