धाराशिवमध्ये ‘माहेर मंगळागौरी महोत्सव २०२६’ चा उत्साह: लेडीज क्लबतर्फे भव्य मंगळागौरी स्पर्धेचे आयोजन!
तुळजापूर प्रतिनिधी:!
श्रावण महिन्याचे औचित्य साधून ‘लेडीज क्लब, धाराशिव’ च्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी भव्य ‘माहेर मंगळागौरी महोत्सव २०२६’ व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. धाराशिव जिल्ह्यातील जास्तीत जास्त महिलांनी या परंपरेचा आनंद घेण्यासाठी आणि स्पर्धेत सहभागी होण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
या स्पर्धेतील विजेत्यांसाठी आकर्षक रोख बक्षिसे ठेवण्यात आली आहेत:
प्रथम पारितोषिक: ₹५०,०००
द्वितीय पारितोषिक: ₹३५,०००
तृतीय पारितोषिक: ₹२५,०००
प्रोत्साहनपर पारितोषिके: ₹११,००० (३ पारितोषिके) व ₹५,००१ (२ पारितोषिके)
कार्यक्रम व स्पर्धेचे नियम:
दिनांक व वेळ: रविवार, ६ सप्टेंबर २०२६ | दुपारी ३:०० वाजता
स्थळ: लेडीज क्लब, धाराशिव
अंतिम नोंदणी तारीख: ४ सप्टेंबर २०२६
नियम व अटी:
नोंदणी लेडीज क्लब, धाराशिव येथे करावी.
मंगळागौरी स्पर्धेत भाग घेणाऱ्या महिलांच्या ग्रुपमध्ये कमीत कमी १० जणी असाव्यात.
ग्रुपमध्ये मुलींऐवजी विवाहित, एकल किंवा विधवा महिला असाव्यात (तरुण मुलींचा वेगळा ग्रुप चालेल व त्यांना वेगळे बक्षीस दिले जाईल).
प्रत्येक ग्रुपला सादरीकरणासाठी ५ ते १० मिनिटांचा वेळ दिला जाईल.
ग्रुपने स्वतःचे म्युझिक ट्रॅक स्वतः आणावेत.
बक्षिसाचा अंतिम निर्णय संयोजकांचा राहील.
अधिक माहिती व नोंदणीसाठी सौ. नयना वाघ मॅडम (9422934180), सौ. पनगुडे मॅडम (9420200549), सौ. जाधवर मॅडम (9404623352) किंवा श्रीमती संगीता भोरे मॅडम (9850262916) यांच्याशी संपर्क साधावा.
आयोजक: सौ. अर्चना राणाजगजितसिंह पाटील (अध्यक्ष – जिल्हा परिषद, धाराशिव व अध्यक्ष – लेडीज क्लब, धाराशिव) आणि लेडीज क्लब परिवार.





