Best News Portal Development Company In India

बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म सर्वश्रेष्ठ धम्म ग्रंथ आहे-बौध्दाचार्य उमेश सुरवसे.

*बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म सर्वश्रेष्ठ धम्म ग्रंथ आहे-बौध्दाचार्य उमेश सुरवसे.
उमरगा /लोहारा आदिनाथ भालेराव.
( दि.४)विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म हा सर्वश्रेष्ठ धर्मग्रंथ आहे असे बौद्धाचार्य उमेश सुरवसे यांनी उमरगा तालुक्यातील कसगी येथील नालंदा वाचनालय येथील वर्षावास कार्यक्रमांमध्ये भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथावर ती सखोल असे मार्गदर्शन करत असताना सागीतले.
भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा उमरगा अंतर्गत ग्राम शाखा व नालंदा वाचनालय व महिला मंडळाच्या माध्यमातून वर्षावास कार्यक्रम आयोजित दि. ३१ रोजी रात्री ८ वाजता भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म ग्रंथ वाचन आयोजित कार्यक्रमांमध्ये तथागत भगवान गौतम बुद्ध डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन तालुकाध्यक्ष बौद्धाचार्य उमेश सुरवसे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी सरचिटणीस संगीताताई सोनकांबळे, उपाध्यक्ष रेखाताई कांबळे, सचिव धीरज कांबळे, सचिव मिलिंद कांबळे कुशिंद्र सोनकांबळे, महिलामडळाच्या अध्यक्षा तुळसाबाई कांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पूजन करून त्रिशरण पंचशील बुध्द पुजा घेऊन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
यावेळी सर्वप्रथम मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी पुढे बोलत असताना बौद्धाचार्य उमेश सुरवसे म्हणाले की, बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला धम्म अगदी सोप्या भाषेमध्ये समजेल व आपण त्याचे पालन सहजरीत्या करू शकतो अशा पद्धतीचा धम्म दिलेला आहे ज्या धम्मामध्ये माणसाच्या जीवनाला आनंदी ठेवण्याचं काम या बौद्ध धम्मामध्ये करण्यात आलेले आहे.
बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला धम्माच्या आधारे माणूस हा शांती समृद्धी आणि संतुष्टी प्राप्त करू शकतो व जीवनभर आनंदी राहू शकतो कारण बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या धम्मामध्ये पंचशील आहे अष्टांगिक मार्ग आहेत आणि या पंचशील व अष्टांगिक मार्गातील काहीवचन मी प्राणिमात्रांची हत्या करणार नाही मी खोटे बोलणार नाही मी चोरी करणार नाही मी व्यभिचार करणार नाही मी मध्य प्राशन करणार नाही मी जे कार्य करीन ते सर्वांच्या हिताचं असेल माझ्या डोळ्यांनी जे पाहणार आहे ते मी चांगलं पाहण्याचा प्रयत्न करीन मी जो काही संकल्प करणार आहेत तो सर्वांच्या हिताचा असेल मी माझ्या तोंडाने जे काही दुसऱ्याला बोलणार आहे ते सर्वांच्या कल्याणाचे बोलणार आहे मी कोणालाही लुटणार नाही मी कोणाची चोरी करणार नाही हत्या करणार नाही आणि ज्या माणसांनी या सर्व बाबी आपल्या आयुष्यामध्ये रुजवलेल्या आहेत अशी सर्व माणसं हे आनंदी समृद्धी आणि संतुष्टी कायमस्वरूपी आपल्यामध्ये असल्याचं त्यांना जाणवते म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला धम्म हा जगातील सर्वात सर्वश्रेष्ठ धम्म आहे आणि बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला स्वतः लिखाण केलेला भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म हा धम्मग्रंथ सुद्धा सर्वश्रेष्ठ असल्याचे मत बौद्धाचार्य उमेश सुरवसे यांनी कसगी येथील वर्षावास कार्यक्रमानिमित्त बोलत असताना सांगीतले.
यावेळी ग्रंथपाल नारायण कांबळे प्राध्यापक राजेंद्र कांबळे दिलीप कांबळे राजेंद्र सुरवसे मधुकर कांबळे तेजाबाई कांबळे तुळसाबाई गायकवाड कल्पना गायकवाड प्रियंका गायकवाड प्रजापती कांबळे सविता कांबळे ज्योती कांबळे अनिता लोदे सविता कांबळे सुनंदा सुरवसे पौर्णिमा कांबळे सांची कांबळे प्रगती गायकवाड अनिता कांबळे जानवी कांबळे स्वाती कांबळे रुक्मिणी गायकवाड प्रमिला गायकवाड नागमणी गायकवाड प्रणिता कांबळे समृद्धी कांबळे संजय कांबळे सुमन कांबळे आधी जणांची प्रमुख उपस्थिती सह सर्व उपासिका यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार बुद्ध शासन समितीचे अध्यक्ष कुशिंद्र सोनकांबळे यांनी केले.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india

नळदुर्ग येथील ऐतिहासिक किल्ल्यातील बुरुजावरून दोन मुली व एक मुलगा यांच्या सह उडी मारून एका महिलेचा स्वहत्या करण्याचा प्रयत्न : महिला व मुलगा यांचा जागीच मृत्यू तर दोन मुली गंभीर जखमी!