तुळजापूर येथे ‘लोकमंगल मल्टीस्टेट’ कडून गुणवंत शिक्षकांचा स्नेहरूपी सन्मान; ‘शिक्षक दिन’ उत्साहात साजरा!
तुळजापूर प्रतिनिधी:-
विद्यार्थ्यांच्या आयुष्याला आकार देणाऱ्या आणि समाजात ज्ञानाचा प्रकाश पसरवणाऱ्या शिक्षकांच्या ऋणातून मुक्त होणे शक्य नाही. याच भावनेतून शिक्षक दिनाचे औचित्य साधून ‘लोकमंगल मल्टीस्टेट को-ऑप. क्रेडिट सोसायटी’च्या तुळजापूर शाखेच्या वतीने तुळजापूर शहर व परिसरातील जेष्ठ आणि गुणवंत शिक्षकांचा विशेष सत्कार समारंभ अत्यंत उत्साहात पार पडला.
कार्यक्रमादरम्यान लोकमंगल मल्टीस्टेटच्या वतीने उपस्थित शिक्षकांना शाल, पुष्पगुच्छ, पेन आणि सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
गौरवमूर्ती शिक्षक-
इसाक पटेल सर (तालुका क्रीडा समन्वयक, तुळजापूर)
हुंडेकरी सतीश दिगंबरराव सर (कला शिक्षक, शिंदे हायस्कूल)
आदटराव लालासाहेब लिंबराज सर (क्रीडा शिक्षक, शिंदे हायस्कूल)
क्षीरसागर किसन तुकाराम सर (शिंदे हायस्कूल)
गायकवाड राजू सर (जिल्हा परिषद शाळा, मोरडा)
साळवे सर (शिंदे हायस्कूल)
हुंडेकरी डी. डी. सर (शिंदे हायस्कूल)
पुरी सर (अमृतवाडी)
सुरेश राऊत सर (मसला खुर्द)
सुरवसे सर (जिल्हा परिषद शाळा, सारोळा)
गणेश अंबादास जळके सर (नरेंद्र आर्य विद्यालय, अपसिंगा)
बापूसाहेब कदम सर (कन्या प्रशाला, तुळजापूर)
याप्रसंगी लोकमंगल मल्टीस्टेटचे संचालक मा. सचिन अडगळे साहेब यांनी सर्व शिक्षकांना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. शाखेतील कर्मचाऱ्यांनी उपस्थित नागरिकांना लोकमंगल समूहाची कार्यप्रणाली, विविध ठेव योजना, ‘आई योजना’ तसेच विविध महामंडळांच्या माध्यमातून उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या कर्जांविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.
हा सोहळा यशस्वी करण्यासाठी तुळजापूर शाखाधिकारी राजकुमार पवार, धनंजय कदम, विनोद देवकर, सुनील साळुंखे, काका माने, फजल सिद्धकी, रोशनी सोनवणे व खंडेराव देवकर यांनी विशेष परिश्रम घेतले. या कार्यक्रमाला शाखेचे ग्राहक, नागरिक व शिक्षणप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.






