*होय मी मदिराच (दारु)बोलतेय!*
—————————————
मी बळंनी कुणाकडे जात नाही, मी स्वतःहून कोणाच्या प्रेमात पडत नाही, मला कोणाला दुःख द्यावं असं वाटत नाही ना मला कुणाला उगीच त्रास द्यावा असं कधीच वाटत नाही, *होय मी मदिराच बोलतेय !*
तुम्हीच मला रात्री बे रात्री शोधत येता, मधीरा कुठे आहे? मदिरा कुठे मिळेल का? म्हणता, तशी मी खुप घाणेरडी आहे,मी विषारी आहे,मी महागडीही आहे हे माहीत असतानाही तुम्हीच माझ्या प्रेमात पडता, *होय मी मदिराच बोलतेय !*
मी सर्वांना समानतेची वागणूक देते, जात धर्म, वर्ण हे मी पाहत नाही, लहान असो वा मोठा असो,काळा असो वा गोरा असो हे मी बघत नाही,तुमची इच्छा मी कधीच मारत नाही. कधी एकदा माझ्यावर अटॅक होतो हे मला कळत नाही, चेस चेस करून माझा पहिला घोट आनंदाने तुम्हीच घेता *होय मी मदिराच बोलतेय !*
पहिलेच्या काळात माझ्यावर थोडीच लोकं प्रेम करीत होते,मी मर्यादित होते,आता घरोघरी माझ्यावर भरभरून प्रेम करीत आहेत, लोकं पहिले माझ्यावर चोरून चोरुन प्रेम करायचे, आता उघड उघड माझ्याबरोबर प्रेम करतात,मला घरी घेऊन जातात,मला जपतात,कपाटात,टेबलात मला ठेवतात,बायकोला जपत नाहीत,पण मला खुप जपतात,मी आता सर्वांसाठी खुली आहे,कुठेही उपलब्ध आहे *होय मी मदिराच बोलतेय !*
पहिल्यांदा जो कोणी येईल त्याला मी सांगते मला शिवू नका, मला स्पर्श करू नका, माझे चारित्र्य खराब आहे,मी अवदसा आहे,अनेक लोकांनी मला उपभोगलेले आहे, माझ्यापर्यंत जो कुणी आला तो सरळ कधीच गेला नाही, याची मलाच आज घृणा वाटतं आहे, किती लोकांना मी उध्वस्त व बदनाम करत आहे *होय मी मदिराच बोलतेय !*
मी एकदा पोटात शिरले तर कुणाला हसवते तर कुणाला रडवते, कुणाला पोपटावणी बोलायला लावते तर कुणाला बेशुद्ध करून गुंगी आणते,वेडं करते, अंगावरचे कपडे उतरवते, कुणा कुणाचे लिव्हर मी हळूहळू कुर्तडते तर कुणाच्या तोंडावाटे वा गांडीवाटे सळासळा बाहेर येते *होय मी मदिराच बोलतेय !*
आनंदाच्या व दुःखाच्या क्षणी मी त्यांना हवी आहे,ताण आलं टेन्शन आलं त्यांना मीच पाहिजे असते,वाढदिवस असो,एखादी नवीन आनंदाची घटना घडली असेल तर पार्ट्या देऊन एन्जॉय करताना माझ्याशिवाय त्यांना पर्यायच नाही माझ्याशिवाय समारंभ होतच नाही, महापुरुषांच्या जयंत्यामध्येही आता माझा मोठ्या प्रमाणात शिरकाव झाला आहे, मला जाळून जाळून भट्टीतून काढत होते आता नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून राजरोसपणे दुकानात दर्शनी भागात माझे उंचीचे स्थान बनले आहे *होय मी मदिराच बोलतेय !*
मी अनेकांचे संसार उध्वस्त करत आहे, अनेकांच्या घराला कुलपं लावत आहे, बायको सोडून जाते,मुल बाळं दूर होतात मी फारच महाभयंकर व क्रूर असल्याने अनेकांचे लिव्हर खराब करून अनेकांना देवाघरी पाठवून माझ्या बहिणीचे कपाळ पांढरे करीत आहे,त्यांना मी कर्जबाजारी करून समाजात कुटुंबात कुठही त्याची इज्जत मी ठेवत नाही ,ती मी वेशीला टांगते, त्यांच्या बायका पोरांना खूप वाईट दिवस आणते *होय मी मदिराच बोलतेय !*
मला प्राशन करून कुणीही धनवान झाला नाही, मनोरंजन व करमणुकीचे साधन म्हणून माझा ज्यांनी ज्यांनी घोट घेतला, त्यांच्या शरीरात मला बंदिस्त केलय त्याला मी कधीच कच्च सोडलं नाही, मी अनेकांची फोटो वाढवली गोल गोल ढेरी वाढवते हातापायांच्या काड्या करते, दम्याचा त्रास निर्माण करते, बीपी वाढवते आणि एक दिवस अटॅक आणून त्याला पुढे घालूनच मी घेऊन जाते *होय मी मदिराच बोलतेय !*
पुरुष लोकं जसं माझ्या प्रेमात पडतात तशा बायकाही माझ्या प्रेमात पडून आपले कुटुंब उध्वस्त करीत आहेत,पुरुषासारखा नंगानाच सुरू केला आहे,शाळा कॉलेजमधल्या पोरींनी माझी वाट धरली आहे,माझी संगत हीच आयुष्यातील आनंदायी क्षण आहे असं वाटून मला गिळंकृत करून, आपल्या चारित्र्याचे धिंडवडे काढत आहेत,आई बाप पती भावांना धोका देऊन माझ्याबरोबर महिला वर्गानं अश्लील पणाचा कळस गाठला आहे, आई बापाची नवऱ्याची इज्जत आज त्या वेशीला टांगून स्वतःला आज संपवून घेत आहेत *होय मी मदिराच बोलतेय !*
मी खुप कडक होते लांबून जरी काडी पेटवली तरी माझा मोठा भडका उडत होता, माझा एक घोट घेतला तरी मी त्याचे आतडे,पोटामधल्या अवयवात घुसून ते जाळतच होते पण माझा कडकपणा,माझा रागीटपणा कमी झाला आहे, माझ्यात पाणी जास्त घालून,पाणी मिसळुन माझी प्रतिष्ठा आज कमी करत आहेत माझ्यावर लाखो रुपये कमावून मला फुटकळ बाजार दाखवत आहेत, त्या स्वार्थी लोकांना मी सुखा सुखी कधीच जगू देणार नाही, एक दिवस मी त्यांचाही शेवट करणारच आहे *होय मी मदिराच बोलतेय !*
माझ्या जीवावर पोलीस डिपार्टमेंट मोठे झाले,माझे हप्ते घेत राहिले,माझी विक्री करणा-या विक्रेत्यांना आसरा व आधार दिला आहे, माझ्या जीवावर माझी विक्री करणारे दुकानदार आज मोठे झाले आहेत, हप्ते घेणारे दलालही माझ्यामुळे स्टार्चच्या कपड्यात आणि चारचाकी गाडीत फिरत आहेत,बेवड्यानो तुम्ही मात्र गटार गंगेत न्हाऊन जाताय ,घरातून बायकोचे मंगळसुत्र,भांडी कोंडी चोरून आणून माझी भरती करत आहात, तुमच्या पोटात भाकरी पेक्षा फक्त मीच भरलेली आहे आणि मीच तुम्हाला हवी आहे *होय मी मदिराच बोलतेय !*
शेवटी मी तुम्हाला हात जोडुन विनंती करते मी निसंग आहे मी वाईट आहे मी खराब आहे मी अघोरी आहे मी धोकादायक आहे माझ्याकडे तुम्ही कधीच येऊच नका मला तुम्ही शिवू नका,स्पर्श करु नका,मला तुम्ही पिऊ नका, तुम्ही, माझ्याकडे तुम्ही फिरकू नका, तुम्ही चांगले रहा तुमचा परिवार चांगला ठेवा, असलेला तुमचा मानसन्मान प्रतिष्ठा इज्जत कायम राखा, तुम्ही सुदृढ रहा चांगले रहा निरोगी रहा पोरा बाळांचे शिक्षण करा,लग्न सोहळे आनंदाने पार पाडा मी कधीच तुमच्याकडे येणार नाही तुम्ही माझ्याकडे कधीच येऊ नका हीच एक विनंती तुम्हाला करते *होय मी मदिराच बोलतेय !*
*दयानंद काळुंके, अणदूर ता तुळजापूर*✍️







