*जिल्हा युवा महोत्सवात श्री. छत्रपती शिवाजी महाविद्यालयाला दोन कला प्रकारात प्रथम पारितोषक*
[प्राचार्य डॉ. संजय अस्वले यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा सत्कार]
उमरगा/लोहारा प्रतिनिधी आदिनाथ भालेराव.
दि. ५ सप्टेंबर २०२६ : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर व शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालय, कळंब यांच्या संयुक्त विद्यमानाने ०१ व ०२ सप्टेंबर २०२६ रोजी आयोजित जिल्हा युवा महोत्सवाच्या पारितोषिक वितरण समारंभात श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय, उमरगा येथील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले.
या महोत्सवात ‘रांगोळी’ या कलाप्रकारात सुरवसे सुरज शंकर, एम. कॉम. प्रथम वर्ष याने प्रथम क्रमांक पटकावला. तसेच ‘स्पॉट फोटोग्राफी’ या कलाप्रकारात इनामदार मोहम्मदसैफ हजरत, एम. ए. (समाजशास्त्र) प्रथम वर्ष यानेही प्रथम क्रमांक मिळविला.
दोन्ही यशस्वी विद्यार्थ्यांचा श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय, उमरगा येथे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. एन. अस्वले यांच्या हस्ते तसेच डॉ. जयद्रथ जाधव, वरिष्ठ प्राध्यापक, शिवाजी महाविद्यालय, रेणापुर यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे कौतुक करून त्यांच्या पुढील उज्ज्वल वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
कार्यक्रमास विज्ञान शाखेचे उपप्राचार्य डॉ. विनोद देवरकर, कला शाखेचे उपप्राचार्य डॉ. पद्माकर पिटले, प्रभारी प्राध्यापक डॉ. एस. पी. इंगळे, कला व सांस्कृतिक विभागाचे समन्वयक डॉ. एस. एन. मुच्छटे, डॉ. सी. डी. करे, डॉ. एस. टी. तोडकर, श्रीमती रेश्मा नितनवरे, डॉ. निर्मळे मॅडम, डॉ. सावंत मॅडम, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य गुंडा बापू मोरे, पर्यवेक्षक शैलेश महामुनी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.






