Best News Portal Development Company In India

निरोगी आणि आनंददायी जीवन जगण्यासाठी आपले आरोग्य चांगले राहणे महत्त्वाचे आहे : सौ संगीता देशमुख!

निरोगी आणि आनंददायी जीवन जगण्यासाठी आपले आरोग्य चांगले राहणे महत्त्वाचे आहे : सौ संगीता देशमुख
—————————————————
जळकोट ( अरुण लोखंडे )
मानवी जीवनामध्ये आनंददायी निरोगी जीवन जगण्यासाठी आपले आरोग्य चांगले राहणे अत्यंत महत्त्वाचे असून आनंददायी आणि निरोगी जीवन जगण्यासाठी वेलनेस आणि फिटनेस सेंटरमध्ये सहभागी होणे गरजेचे आहे असे प्रतिपादन धाराशिव जिल्ह्याच्या आरोग्य गुरु सौ. संगीता सुरेश देशमुख यांनी जळकोट तालुका तुळजापूर येथे आयोजित कार्यक्रमात बोलताना केले.
दिनांक दि.५ सप्टेंबर २o२६ रोजी शिक्षक दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे मराठवाडा विभागीय सचिव / संपर्क प्रमुख अरुण लोखंडे यांच्या पुढाकारातून जळकोट तालुका तुळजापूर येथे जिवक वेलनेस अँड फिटनेस सेंटर जळकोट व महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ संघ मुंबई चे विभागीय संपर्क कार्यालयाचे उदघाटन आणि शिक्षकांचा सत्कार अशा आनंददायी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या वेळी वेलनेस अँड फिटनेस च्या धाराशिव जिल्ह्याच्या आरोग्य गुरु
सौ.संगीता देशमुख बोलत होत्या पुढे बोलताना त्या म्हणाल्या की सध्या मानवी आरोग्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात भेडसावत असून संकरित आहारामुळे माणसाला अनेक आजारांना सामोरे जावे लागत आहे विशेषत स्त्रियांमध्ये आजारांचे प्रमाण अधिक दिसून येत आहे.वजन वाढणे,वजन कमी होणे,अशक्तपणा जाणवणे, रक्तदाब,मधुमेह, हाता पायाला मुंग्या येणे वगैरे आजाराला आपणाला सामोरे जावे लागत आहे.या पासून सुटकारा मिळण्यासाठी आहातून आरोग्य कडे हे ब्रिद घेवून” निरोगी शरीर, निरोगी मन,निरोगी जीवन हाच आमचा संकल्प” हा मूलमंत्र जपत वेलनेस आणि फिटनेस ची संकल्पना पुढे आलेली असून आपल्या निरोगी आणि आनंददायी आरोग्यासाठी जिवक वेलनेस आणि फिटनेस सेंटर मध्ये आपण सहभागी व्हावे असे आवाहन शेवटी त्यांनी केले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी जिल्हा परिषद सदस्य गणेश दादा सोनटक्के हे होते तर उद्घाटक म्हणून आरोग्य गुरु सुरेश देशमुख हे होते.या वेळी वेलनेस आणि फिटनेस सेंटर से वरिष्ठ सल्लागार महेश लोमटे,महेश कांबळे, बाळासाहेब केसकर,विनोद जाधव,संतोष मुसळे,हनुमंत कांबळे,काकासाहेब देशमुख, राम प्रजापती आदींची प्रमुख उपस्थिती होती.
प्रारंभी रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर, थोर समाज सुधारक महात्मा ज्योतिबा फुले,स्त्री शिक्षणाच्या प्रनेत्या क्रंती ज्योती सावित्रीमाई फुले आणि देशाचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन आधी महामानवांच्या प्रतिमांचे पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करून उद्घाटक सुरेश देशमुख यांच्या हस्ते फित कापून “जीवक वेलनेस अँड फिटनेस सेंटर जळकोट व महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे संपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले.
. या प्रसंगी शिक्षक दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई तालुका शाखा तुळजापूरच्या वतीने शिक्षकांचा येथोचित सत्कार करण्यात आला.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते अनिल छत्रे,प.स. सदस्य अँड. आशिष सोनटक्के, कृषी उत्पन्न बाजार समिती मुरूम चे संचालक भालचंद्र लोखंडे, प्रा.शरद गायकवाड, आनंद पिंटू पुदाले,सुरज डावरे, राजेश लोखंडे,स्वदेश लोखंडे,युवराज लोखंडे,प्रदीप लोखंडे,उमेश गायकवाड सतीश गायकवाड पत्रकार विजय पिसे,संजय रेणुके,शामकांत नागीले,दादासाहेब बनसोडे,किशोर धुमाळ, सतीश पिसे,इरफान काझी सचिन कदम,आकाश अलकुंटे,मंगेश सुरवसे महिला कार्यकर्त्या ज्योतीताई लोखंडे, अंजली छत्रे,सोनल भालेराव, जया माने,मनीषा गायकवाड, सपना गायकवाड, नगीना लोखंडे,सहशिक्षिका आवटे मॅडम,रेणुके मॅडम,महामुनी मॅडम,सोमवंशी मॅडम,
भोसले मॅडम,मोकाशे मॅडम,सहशिक्षक विजय मोरे, भैरवनाथ कानडे,पंडित कदम,अभिमन्यू कदम, शिवाजी सुरवसे,भालचंद्र पोतदार, आणाप्पा सरकाळे सर, कदम सर,माने सर,साखरे सर, गौतम राठोड सर,बालाजी माळी सर सह शिक्षक शिक्षिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक रमेश औसेकर सर यांनी केले तर सूत्रसंचालन एस. के. गायकवाड यांनी केले व आभार प्रदर्शन चंद्रकांत स्वामी सर यांनी केले.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail