Best News Portal Development Company In India

अल्पवयीन मुलीचे बालविवाह लावून लैंगिक अत्याचार; बाळ गमावल्यानंतर ढोकी पोलिसांत गुन्हा दाखल!

अल्पवयीन मुलीचे बालविवाह लावून लैंगिक अत्याचार; बाळ गमावल्यानंतर ढोकी पोलिसांत गुन्हा दाखल!
​तुळजापूर प्रतिनिधी:-
एका सोळा वर्षीय अल्पवयीन मुलीचा जबरदस्तीने बालविवाह लावून तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. अत्याचारामुळे गर्भवती राहिलेल्या या पीडितेच्या अर्भकाचा मृत्यू झाला असून, तिला उपचारासाठी छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल करावे लागले आहे. याप्रकरणी ढोकी पोलीस ठाण्यात पतीसह लग्न लावणाऱ्यांवर गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
​मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी ही १६ वर्षे ९ महिन्यांची म्हणजेच अल्पवयीन आहे हे माहीत असतानाही, संशयित आरोपींनी आपसात संगनमत करून १२ डिसेंबर २०२२ रोजी तिचा विवाह एका तरुणासोबत लावून दिला होता. विवाहानंतर आरोपी तरुणाने तिच्यावर सतत लैंगिक अत्याचार केला.
​या अत्याचारातून पीडित मुलगी गर्भवती राहिली. मात्र, दुर्दैवाने गर्भातील अर्भकाचा मृत्यू झाला. त्यामुळे पीडितेला तातडीने श्री छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचारासाठी दाखल करणे भाग पडले.
​या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन ढोकी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अनिल तांबडे यांनी ९ सप्टेंबर २०२६ रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरून (FIR) आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.
​दाखल झालेले कायदेशीर कलम:
​भारतीय न्याय संहिता (BNS): कलम ६४(१), ६४(२)(एम), ३(५)
​पोक्सो (POCSO) कायदा २०१२: कलम ४, ८, १२, १७
​बालविवाह प्रतिबंधक कायदा: कलम ९, १०, ११
​अल्पवयीन मुलीचे आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्या या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत असून आरोपींवर कठोर कारवाईची मागणी होत आहे.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india