Best News Portal Development Company In India

धाराशिवमध्ये ‘शिक्षण प्रेरणा महोत्सवा’चे भव्य आयोजन; ‘आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ’चा ६४ वा वर्धापन दिन व गुरुवर्य के. टी. पाटील सर यांची ९७ वी जयंती!

धाराशिवमध्ये ‘शिक्षण प्रेरणा महोत्सवा’चे भव्य आयोजन; ‘आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ’चा ६४ वा वर्धापन दिन व गुरुवर्य के. टी. पाटील सर यांची ९७ वी जयंती!
​तुळजापूर प्रतिनिधी:-
शिक्षणाच्या माध्यमातून ग्रामीण व शहरी भागाचा कायापालट करणाऱ्या ‘आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ, धाराशिव’ या नामांकित संस्थेचा ६४ वा वर्धापन दिन तसेच शिक्षणमहर्षी गुरुवर्य के. टी. पाटील सर (बप्पा) यांच्या ९७ व्या जयंतीनिमित्त शुक्रवारी, ११ सप्टेंबर २०२६ रोजी ‘शिक्षण प्रेरणा महोत्सवा’चे भव्य आयोजन करण्यात आले आहे.
​हा सोहळा सकाळी ११:०० वाजता, धाराशिव येथील हातलाई मंगल कार्यालय येथे अत्यंत उत्साहात पार पडला आहे.
​प्रमुख उपस्थिती आणि सन्माननीय पाहुणे
​या राज्यस्तरीय भव्य सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्राचे परिवहन मंत्री तथा धाराशिवचे पालकमंत्री मा. ना. श्री. प्रताप सरनाईक येणार पण कामानिमित्त अनुपस्थित राहिले . तर प्रमुख अतिथी म्हणून गृहराज्यमंत्री मा. ना. श्री. योगेश कदम यांची विशेष उपस्थिती होती. त्यांचे अनमोल मार्गदर्शन विद्यार्थ्यांना लाभले. त्यांनी मार्गदर्शनपर भाषणात अनेक अनुभव कथन केले.
​याशिवाय, भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी, मराठवाड्यातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक व वारकरी संप्रदायातील अनेक दिग्गज नेते, खासदार, आमदार आणि सिनेट सदस्य या सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
​विविध गौरव सोहळ्यांचे आयोजन करण्यात आले .
​’शिक्षण प्रेरणा महोत्सवा’च्या माध्यमातून शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या घटकांचा गौरव करण्यात आला आहे. यामध्ये प्रामुख्याने:
​मराठवाड्यातील आदर्श शिक्षण संस्था गौरव सोहळा (मराठवाड्यातील विविध नामांकित संस्थांचा सन्मान)
​मातृपितृ कृतज्ञता सोहळा
​आदर्श कर्मचारी सत्कार सोहळा
​सेवानिवृत्त कर्मचारी गौरव सोहळा
​यशवंत गुणवंत विद्यार्थी गौरव सोहळा
​शैक्षणिक क्षेत्रातील दैदीप्यमान वाटचाल
​’आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ’ या संस्थेने प्राथमिक शिक्षणापासून ते उच्च, तांत्रिक, वैद्यकीय, अभियांत्रिकी (M.Tech, B.E., Pharmacy, Nursing, ITI, Diploma) आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर संलग्नित संशोधन केंद्रापर्यंत (Ph.D.) ५० पेक्षा जास्त शाखांच्या माध्यमातून हजारों विद्यार्थ्यांना शिक्षणाची दारे खुली करून दिली आहेत.
​शिक्षणाच्या प्रसारासाठी मोलाचे योगदान देणाऱ्या गुरुवर्य के. टी. पाटील सर (बप्पा) यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी आणि या प्रेरणादायी महोत्सवास उपस्थित राहण्याचे नम्र आवाहन करण्यात आले होते. आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मा. श्री. सुधीर केशवराव पाटील, तुळजाभवानी अ.को. बँकेचे चेअरमन मा. श्री. संजय केशवराव पाटील, विधीज्ञ सल्लागार मा. श्री. ॲड. सुधाकर मुंढे साहेब, सर्व संचालक मंडळ, प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या वतीने आयोजन करण्यात आले होते.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india