*धाराशिव जि प उपाध्यक्षा सौ उषाताई गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त*
*नगराध्यक्ष किरण गायकवाड यांच्या वतीने*
*उमरगा जिल्हा परिषद हायस्कूल येथील गरजू मुलींना दहा सायकलीचे वाटप*
उमरगा/लोहारा प्रतिनिधी आदिनाथ भालेराव.
उमरगा येथील जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये गरीब व होतकरू मुलींसाठी धाराशिव जि प च्या उपाध्यक्ष सौ उषाताई गायकवाड यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून युवा सेनेचे मराठवाडा निरीक्षक व उमरग्याचे नगराध्यक्ष किरण गायकवाड यांच्यावतीने दहा सायकलचे वाटप करण्यात आले यावेळी मुख्याध्यापक पद्माकर मोरे नगरसेवक शफी चौधरी नगरसेविका आरती शिंदे अश्विनी सोनकांबळे प्रिया शरद पवार सुप्रिया घोडके स्वाती स्वामी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुजाता मोरे, विधानसभा संघटक शरद पवार, शहर प्रमुख योगेश तपसाळे, युवा सेना जिल्हाप्रमुख व कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक व नगरसेवक सचिन जाधव, गोपाळ जाधव प्रशांत स्वामी विनोद कोराळे शरद पवार ज्ञानेश्वर सांगवे अमर शिंदे सिद्धार्थ सोनकांबळे ,उपस्थित होते. उमरग्याच्या जिल्हा परिषद हायस्कूलच्या भौतिक गरजा पूर्ण करण्यासाठी सर्वतोपरी मदत करणारे उमरग्याचे नगराध्यक्ष किरण गायकवाड यांनी शाळेतील गरीब व होतकरू मुलींच्या शिक्षणामध्ये घरापासून शाळेपर्यंत ये जा करण्या वाचून शिक्षण अपूर्ण राहू नये या उदात्त हेतूने दहा सायकली भेट देऊन शाळेतील मुलींच्या जाण्या येण्याचा प्रश्न मिटवून मुलींचे शिक्षणातील गळतीचे प्रमाण कमी करण्यासाठी चांगला प्रयत्न केला आहे. यापूर्वी किरण गायकवाड यांनी मुलींना दहा सायकलीचे वाटप केले होते. विद्यार्थ्यांना चिखलातून ये जा करावे लागू नये यासाठी सिमेंट रस्ता, शाळेचे क्रीडांगण दुरुस्ती, सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक पॅडचे वाटप, शालेय परिसरात वृक्षारोपण, विद्यार्थ्यांसाठी सुंदर हस्ताक्षर प्रकल्प, स्वतःच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन, अशा अनेक उपक्रमातून शाळेला सहकार्य केलेले आहे. आजही दहा विद्यार्थिनींना सायकली देऊन त्या मुलींच्या आयुष्यात आनंदाचा क्षण निर्माण केलेला आहे सायकल मिळाल्यानंतर मुलींच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत होता या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रशालेतील धनराज तेलंग, बशीर शेख, विद्यानंद सुत्रावे, सोनाली मुसळे, सदानंद कुंभार ,नागेश स्वामी, प्रवीण शिंदे, महादेव कुनाळे ,वर्षा राणी पाटील, फजल शेख आदीनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक पद्माकर मोरे सूत्रसंचालन भाग्यश्री पंडित तर आभार सोनाली मुसळे यांनी मांनले कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने युवा सेनेचे कार्यकर्ते व विद्यार्थी उपस्थित होते.






