Best News Portal Development Company In India

कदेर गटात जि. प. उपाध्यक्षा सौ. उषाताई गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांची धूम; ८०० विद्यार्थ्यांना साहित्य व विद्यार्थिनींना सायकल वाटप!

कदेर गटात जि. प. उपाध्यक्षा सौ. उषाताई गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांची धूम; ८०० विद्यार्थ्यांना साहित्य व विद्यार्थिनींना सायकल वाटप.
उमरगा/लोहारा प्रतिनिधी आदिनाथ भालेराव.

जिल्हा परिषद उपाध्यक्षा सौ. उषाताई गायकवाड यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कदेर गटात विविध स्तुत्य सामाजिक उपक्रम राबवण्यात आले. किरण रवींद्र गायकवाड फाउंडेशन आणि शिवसेना-युवासेना पदाधिकाऱ्यांच्या वतीने वाढदिवसाचा बडेजाव टाळून.
समाजातील विविध घटकांना थेट मदत करत हा दिवस अत्यंत वेगळ्या आणि आदर्श पद्धतीने साजरा करण्यात आला.
या अंतर्गत ‘एक दिवस, १६ शाळा’ हा महासंकल्प हाती घेऊन कदेर गटातील १६ जिल्हा परिषद शाळांमधील ८०० गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे मोफत वाटप करण्यात आले. तसेच दूरवरून शाळेत ये-जा करणाऱ्या जि. प. शाळेतील गरजू विद्यार्थिनींना शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळावे म्हणून सायकलींचे वाटप करण्यात आले.
सामाजिक बांधिलकी जपत बहुजन हिताय वसतिगृहातील सर्व विद्यार्थ्यांना आणि स्थानिक वृद्धाश्रमातील सर्व ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी आवश्यक खुर्च्यांचे वाटप करण्यात आले. यासोबतच तुळजाई मतिमंद शाळेतील विशेष मुलांच्या कलागुणांना आणि मनोरंजनाला वाव देण्यासाठी आधुनिक साउंड सिस्टम भेट देण्यात आली. पर्यावरणाचा समतोल राखण्याच्या दृष्टीने शहरात विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण देखील करण्यात आले.
एकाच दिवसात अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने राबवलेल्या या सर्वसमावेशक उपक्रमांबद्दल सौ. उषाताई गायकवाड आणि किरण रवींद्र गायकवाड फाउंडेशनचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. या सर्व कार्यक्रमांना शिवसेना-युवासेना पदाधिकारी, कार्यकर्ते, मुख्याध्यापक, शिक्षक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india