Best News Portal Development Company In India

भक्तिमय वातावरणात झाले गणरायाचे आगमन; शेती व पिण्याच्या पाण्यासाठी पाऊस पडावा म्हणून आमदार प्रविण स्वामी यांचे श्रींच्या चरणी साकडे.

भक्तिमय वातावरणात झाले गणरायाचे आगमन; शेती व पिण्याच्या पाण्यासाठी पाऊस पडावा म्हणून आमदार प्रविण स्वामी यांचे श्रींच्या चरणी साकडे.

उमरगा/लोहारा प्रतिनिधी आदिनाथ भालेराव.

सर्वत्र मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात लाडक्या गणरायाचे आगमन झाले आहे. घरोघरी आणि सार्वजनिक मंडळांमध्ये “गणपती बाप्पा मोरया”च्या जयघोषात श्रींची प्रतिष्ठापना करण्यात आली. या पार्श्वभूमीवर आमदार प्रविण स्वामी यांनीही गणरायाची मनोभावे पूजा-अर्चा करून बाप्पाच्या चरणी महत्त्वाचे साकडे घातले आहे.

येत्या दिवसांत शेतीसाठी आणि पिण्याच्या पाण्यासाठी जोरदार पाऊस पडावा, जेणेकरून बळीराजा समोरील पाण्याचे संकट दूर होईल, अशी प्रार्थना आमदार प्रविण स्वामी यांनी केली. त्याचप्रमाणे, राज्यातील शेतकरी अडचणीत सापडला असून त्याला दिलासा देण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या हिताचे योग्य निर्णय घेण्यासाठी राज्य सरकारला सदबुद्धी देवो, अशी आग्रही प्रार्थना त्यांनी गणरायाकडे केली.

यावेळी पत्रकारांशी बोलताना आमदार प्रविण स्वामी म्हणाले, “शेतकरी हा आपला अन्नदाता आहे. सध्या अनेक भागांत पावसाची गरज असून पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर होत आहे. त्यामुळे गणरायाने निसर्गाची कृपादृष्टी ठेवावी आणि सरकारनेही शेतकरीविरोधी भूमिका न घेता बळीराजाला भक्कम पाठबळ देणारे निर्णय घ्यावेत, हीच या पावन पर्वणीवर बाप्पाच्या चरणी प्रार्थना आहे.”

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india